भाजप आमदाराची मुलगी म्हणते, पप्पा मला शांतपणे जगू द्या!

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 जुलै 2019

साक्षी मिश्रा हिने व्हिडीओच्या माध्यमातून जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन एका दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारायला गुंड पाठवल्याचे तिने म्हटले आहे. दलित मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मुलीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बरेली : उत्तर प्रदेशमधील भाजपचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने प्रेमविवाह केल्यानंतर वडिलांना व्हिडिओतून संदेश देताना म्हटले आहे, की आम्हाला शांतपणे जगू द्या. तुम्ही पाठविलेल्या गुंडांमुळे आम्ही खूप पळालो असल्याचेही तिने म्हटले आहे.

साक्षी मिश्रा हिने व्हिडीओच्या माध्यमातून जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे. कुटुंबियांच्या विरोधात जाऊन एका दलित तरुणाशी लग्न केल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारायला गुंड पाठवल्याचे तिने म्हटले आहे. दलित मुलाशी लग्न केलेल्या उत्तर प्रदेशातील भाजपा आमदाराच्या मुलीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून वडिलांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा मुलीने केला आहे. साक्षी हिने घरच्या व्यक्तींपासून जीवाला धोका असल्याने पोलिस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. राजेश मिश्रा हे भाजपाचे आमदार आहेत. 

साक्षीने काही दिवसांपूर्वी पळून जाऊन अजितेश कुमार या दलित तरुणाशी लग्न केले होते. मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने त्यांनी तिला मारायला गुंड पाठवल्याचे साक्षीने व्हिडीओत म्हटले आहे. 'पप्पा…तुम्ही राजीव राणाप्रमाणे माझ्यामागे गुंड पाठवलेत. आमचा जीव धोक्यात आहे. अभी आणि त्याच्या नातेवाईकांना त्रास देणं थांबवा. मला आनंदी राहायचं आहे, शांततेत जगू द्या. भविष्यात जर मला, अभी किंवा त्याच्या कुटुंबाला काही झालं तर यासाठी माझे वडील भाऊ आणि राजीव राणा जबाबदार असतील. जे माझ्या वडिलांना मदत करत आहेत, त्यांनी मदत करणं थांबवा' असेही साक्षीने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UP MLAs daughter fears honour killing after marrying Dalit asks police to provide security