'सर्वसामान्यांचे कपडे काढून घेणारे मोदी आधुनिक गांधी'

MNS Chief Raj Thackeray Targets PM Modi With A Cartoon On Gandhi Jayanti
MNS Chief Raj Thackeray Targets PM Modi With A Cartoon On Gandhi Jayanti

मुंबई - 'सर्वसामान्यांचे कपडे काढून घेणारे मोदी आधुनिक गांधी' असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज  ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर केली आहे. 

राज यांनी काढलेली व्यंगचित्रे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ते व्यंगचित्राच्या माध्यमातून भाजप सरकारवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. आता त्यांनी गांधी जंयतीच्या पार्श्वभुमीवर एक नवीन व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्रातून त्यांनी टीकात्मकपणे महात्मा गांधीजींच्या जयंतीचे अभिवादन केलं आहे.

या व्यंगचित्रात राज यांनी कापडापासून सूत तयार करणारे गांधींजी चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दर्शवले आहेत. नरेंद्र मोदी या व्यंगचित्रात चरखा चालवताना दिसत आहेत. तर नेहमीप्रमाणे मोदींच्या बाजूला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा दाखवले आहेत. राज यांनी एकप्रकारे पंतप्रधान मोदींवर टीका करताना, कापडापासून सूत बनविणारे महात्मा मोदी, असेच चित्र व्यंगचित्रातून रेखाटले आहे. 

राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणेच आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपाध्यक्ष अमित शहांना लक्ष्य केलं आहे. आपल्या व्यंगचित्रातून महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी व्यक्त होताना, राज यांनी मोदींना आधुनिक गांधी बनवले आहे. विशेष म्हणजे भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या अंगावरील कपडे काढून हे सूत बनविण्यात येत असल्याचे व्यंगचित्रात दिसत आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि विचारवादाचा उडालेला गोंधळ कचऱ्याच्या ढिगासारखा गुंडाळल्याचे राज यांनी व्यंगचित्रातून दाखवले आहे. राज यांच्या या व्यंगचित्रात भिंतीवर अडकवलेल्या छायाचित्रातून महात्मा गांधी नरेद्र मोदींकडे आश्चर्याने पाहत असल्याचेही राज यांनी दाखवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com