राष्ट्रवादीला हवी मनसेची साथ तर; काँग्रेसला नको

राष्ट्रवादीला हवी मनसेची साथ तर; काँग्रेसला नको

मुंबई- निवडणुका जवळ येऊ लागल्याने सगळेच पक्ष युती-आघाडीसाठी आपाआपली मोट बांधण्याची तयारी करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडीमध्ये मनसेला घेण्याचा प्रस्ताव काँग्रेस पक्षासमोर ठेवला आहे. पण, काँग्रेसला महाआघाडीमध्ये मनसे नको आहे, असे स्पष्टीकरण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी दिले आहे.

मनसेचा समावेश करुन महाआघाडी अधिक बळकट करण्यासाचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसकडून आला आहे, परंतु, या प्रस्तावाला काँग्रेसचा केंद्रीय आणि राज्य स्तरावर विरोध आहे, अशी माहिती देत मनसे महाआघाडीचा भाग नसेल, असं निरुपम यांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजयरथ रोखण्यासाठी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणं दिसण्याची शक्यता आहे. मनसे आणि आमची विचारधारा जुळत नाही. मनसे कायद्याचं पालन करत नाही, मनसे हिंसेचं राजकारण करते. असं म्हणत मनसे महाआघाडीचा भाग होणार नाही, असं निरुपमांनी स्पष्ट केले आहे. 

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या जवळीकतेमुळे मनसे-राष्ट्रवादीमध्ये काहीतरी शिजतेय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता राष्ट्रवादीकडून महाआघाडीमध्ये मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव सादर केल्यामुळे ही चर्चा खरी ठरणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी मनसे राज्यात एकत्र लढणार का? याबाबतच्या चर्चेला आता राजकीय वर्तुळात उधाण आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com