सावधान : नव्या नियमांमुळे आजपासून खिशावर येणार ताण

टीम ई-सकाळ
रविवार, 1 डिसेंबर 2019

एअरटेल, रिलायन्स जियो,  आयडिआ, वोडाफोन सारख्या नामवंत दूरसंचार (टेलिकॉम) कंपन्यांच्या  डेटा प्लॅन आणि कॉल दरात वाढ झाली आहे.

पुणे : फोनेवर तासंतास बोलताय? सोशल मीडियावर आणि इंटरनेटवर वेळ घालवताय? नवीन पॉलिसी घेण्याचा विचार आहे का.? बाहेर फिरायला जायचंय आणि एटीएममधून पैसे काढायचे आहेत? या सगळ्यांसाठी आता थोडे जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.विमा पॉलिसी, मोबाईलकॉल दरापासून आयडीबीआयच्या एटीएम मधून पैसे कडण्यासाठीचे सर्व नियम रविवार (ता. १) पासून बदलले आहेत. बदलण्यात आलेल्या या नियमावलीमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. यातील बहुतांश नियम तुमच्या खिशाव रभर टाकणार आहेत. काय आहेत बदलले हे नवीन नियम?

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

महागडे कॅल दर आणि डेटाही
एअरटेल, रिलायन्स जियो,  आयडिआ, वोडाफोन सारख्या नामवंत दूरसंचार (टेलिकॉम) कंपन्यांच्या  डेटा प्लॅन आणि कॉल दरात वाढ झाली आहे. म्हणजेच टॅरिफ प्लॅन पहिल्या किंमतीच्या तुलनेत वाढले आहेत. कंपनी घाट्यातून बाहेर काढण्यासाठी हे नियम बदलण्यात आले असल्याचे सांगितले जाते. परंतु दरात किती प्रमाणात वाढ झाली आहे हे अद्याप कंपन्यांनी स्पष्ट  नाही केले.

विमा पॉलिसी महागल्या
इंश्योरेन्स रेगुलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाने (आयआरडीएआय) विमा पॉलिसीचे नवीन नियम १ डिसेंबर पासून सुरु केले आहेत. या मुळे  विमा पॉलिसींच्या  प्रीमियम मध्ये १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. हा नियम १ डिसेंबरच्या आधी घेण्यात आलेल्या पॉलिसींसाठी नसेल.

एटीएम ट्रांजेक्शनचे आयडीबीआयचे नियम बदलले
आयडीबीआय बँकेचे खातेदारांनी जर पैसे काढण्यासाठी दुसऱ्या बँकेच्या एटीएमचा वापर केला आणि कमी बॅलेन्समुळे ट्रांजेक्शन झाले नाही तर खातेदारांना आयडीबीआय बँकेला अतिरिक्त २० रुपये द्यावे लागतील. 

२४ तास एनईएफटीची सुविधा
एनईएफटीची सुविधा १ डिसेंबरच्या आधी सकाळी ८ ते सायंकाळी ७ पर्यंत लोकांना उपलब्ध होती. परंतु, आता हा नियम बदलण्यात आला असून, ही सुविधा लोकांसाठी २४ तास उपलब्ध असेल. तसेच जानेवारी पासून यावर लागणारे अतिरिक्त शुल्क देखील बंद करण्यात येणार आहे. 

आणखी वाचा - देवेंद्र फडणवीस विधानसभेतही म्हणाले, 'मी पुन्हा येईन'

रेल्वेतील चहा आणि जेवणाचा दरात वाढ
राजधानी, शताब्दी आणि दुरांतो सारख्या रेल्वे मध्ये मिळणारे चहा, नाश्ता आणि जेवण महागणार आहे. रेल्वे बोर्डच्या पर्यटन आणि खाद्य विभागाच्या आदेशानुसार हा बदल करण्यात आला आहे. तसेच आता या रेल्वेमधून  प्रवास करणार्यांना अधिक पैसे मोजावे लागणार आहे. 

आणखी वाचा - तरुणांच्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंनी फोडली वाचा

इथेनॉलच्या किमतीत वाढ
एक डिसेंबर पासून 'सी' श्रेणीच्या इथेनॉलची किंमत ४३.७५ रुपये प्रति लिटर तर 'बी' श्रेणीच्या इथेनॉलची किंमत ५४. रुपये प्रति लिटर झाली आहे. इथेनॉलचा दर वाढीचा निर्णय सप्टेंबर मध्येच घेण्यात आला असून याची अंमलबजावणी १ डिसेंबर पासून करण्यात अली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mobile call rates data insurance premium to increase from 1 december