दिल्ली, हरियानाला भूकंपाचा धक्का

वृत्तसंस्था
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

भूकंपाचे धक्के जवळपास 30 सेकंद जाणवत होते. या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर, जयपूर, अलवर रेवाडी आदी भागात भूकंपाने काहीकाळ भीतीचे वातावरण होते.

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीसह हरियानाला आज (गुरुवार) पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

राष्ट्रीय भूगर्भशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेचार वाजता दिल्ली, हरियानासह उत्तर भारताला भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचा केंद्रबिंदू दिल्ली-हरियाना सीमेवरील रेवाडी जिल्ह्यातील बावल भागात होता. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.4 इतकी मोजण्यात आली आहे.

या भूकंपामुळे कोठेही जिवीत किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पण, पहाटे बसलेल्या या धक्क्यामुळे अनेकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. भूकंपाचे धक्के जवळपास 30 सेकंद जाणवत होते. या भूकंपामुळे दिल्ली एनसीआर, जयपूर, अलवर रेवाडी आदी भागात भूकंपाने काहीकाळ भीतीचे वातावरण होते. पंजाबमधील जलंधर जिल्ह्याला बुधवारी 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता.

Web Title: Moderate earthquake hits Delhi, Haryana