ओडिशाला अतिरिक्त एक हजार कोटी; फणी'च्या हानीची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी

ओडिशाला अतिरिक्त एक हजार कोटी; फणी'च्या हानीची पंतप्रधानांकडून हवाई पाहणी

भुवनेश्‍वर : फणी वादळामुळे ओडिशामध्ये झालेल्या हानीची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाई पाहणी केली. यानंतर मोदींनी ओडिशाला केंद्र सरकारकडून अतिरिक्त एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. 

या वादळाची पूर्वसूचना येताच केंद्राने पूर्वीच 381 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. या वादळामुळे ओडिशामध्ये मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनाचे काम करावे लागणार असल्याने ते वेगाने होण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. याशिवाय, या वादळामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची मदतही मोदींनी आज जाहीर केली. देशाच्या पूर्व किनारपट्टीला कायम वादळांना सामोरे जावे लागते. या वादळांमुळे होणारे नुकसान कमी व्हावे, यासाठी दीर्घकालीन योजना आखण्याची आवश्‍यकता मोदींनी व्यक्त केली. 

ओडिशा सरकारी स्तुती 
राजकीय विरोधक असलेल्या बिजू जनता दलाच्या सरकारचे मोदींनी या वेळी कौतुक केले. वादळाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविल्याने मोठी हानी टळली, असे मोदींनी पत्रकारांना सांगितले. तसेच, या वादळाला धैर्याने तोंड दिल्याबद्दल येथील जनतेचीही त्यांनी स्तुती केली. पुनर्वसनासाठी केंद्राकडून सर्व प्रकारची मदत करण्यास तयार असल्याचे मोदी यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com