बागपत मध्ये मोदींची क्रॉंग्रेसवर जोरदार टिका

वृत्तसंस्था
रविवार, 27 मे 2018

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपत येथील 'ईस्टर्न पिरिफेरल एक्सप्रेसवे'चे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मोदींनी कॉंग्रेसवर जोरदार टिका केली. मोदी म्हणाले, एका कुटुंबाची पुजा करणारे लोकशाहीची पुजा करू शकत नाहीत. सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या देशाच्या सैन्याच्या शौर्याला नाकारणारेही हेच आहेत. जेव्हा अंतरराष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा यंत्रणा भारताची प्रशंसा करतात तेव्हा त्यांच्या मागेही काठी घेऊन लागणारे हे लोक आहेत. देशातील सव्वाशे कोटी लोकांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम केल्यास एक भारत, श्रेष्ठ भारत हा संकल्प आणखी मजबूत होणार आहे.

आमचे सरकार ऊस शेतकऱ्यासाठी निरंतर काम करत आहे. मागील वर्षी ऊसाचा भाव 11 टक्क्यांनी वाढवला होता. यामुळे 5 कोटी ऊस उत्पादक शेकऱ्यांना याचा थेट फायदा झाला होता. साखर कारखान्याकंडून मोबदला मिळण्यास उशीर होऊ नये म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे प्रति क्विंटल ऊसाला साडेपाच रुपयांची आर्थिक मदत सारख कारखान्याकडून दिली जाईल. ही मदत साखर कारखान्यांच्या हातात न जाता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रांन्सफर केली जाणार आहे. सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भात संवेदनशील आहे.

आज देशात शेतकऱ्यांमध्ये अफवा पसरवल्या जात आहेत. आपल्या राजकिय फायद्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरही खुलेआम खोटे बोलले जाते. दलित अत्याचाराच्या घटना असो की आरक्षण केवळ खोटे बोलून अफवा पसरवून लोकांना भ्रमित करण्याचे कारस्थान विरोधकांकडून केले जाते. दलित, आदिवासांसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये अडथळा आणण्याचे काम क्रॉंग्रेसकडून सुरू आहे.

Web Title: modi attack on congress in bagpat