मोदी-जिनपिंग यांची पुन्हा भेट

पीटीआय
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

चीनचे क्रांतिकारी नेते माओ झेडुंग यांचे आवडते पर्यटनस्थळ असणाऱ्या वुहानमध्ये होत असलेल्या दोन दिवसीय औपचारिक परिषदेतही मोदी सहभागी होणार आहेत. 

वुहान : गुजरातमधील महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमातील पहिल्या अनौपचारिक भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (ता. 27) चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची पुन्हा भेट घेत त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. चीनचे क्रांतिकारी नेते माओ झेडुंग यांचे आवडते पर्यटनस्थळ असणाऱ्या वुहानमध्ये होत असलेल्या दोन दिवसीय औपचारिक परिषदेतही मोदी सहभागी होणार आहेत. 

या परिषदेमध्ये वैश्‍विक, प्रादेशिक आणि द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. वुहानमधील प्रसिद्ध "ईस्ट लेक'च्या काठावर बसून दोन नेते चर्चा करणार आहेत. येथील यांगत्से नदीच्या काठावर एक आकर्षक उद्यान उभारण्यात आले असून, कधीकाळी सुटीच्या दिवशी माओ येथे राहायला येत असत. याच ठिकाणी माओंचा आकर्षक बंगला असून, त्याचे आता स्मारक करण्यात आले आहे. शी जिनपिंग आणि मोदी या वास्तूलाही भेट देतील. दरम्यान, या परिषदेचे अधिकृत वेळापत्रक अद्याप प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. 

Web Title: modi chi jinping again meeting