भ्रष्टाचाऱ्यांची उडाली झोप- मोदी

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

गाझीपूर (उत्तर प्रदेश) - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला सामान्य नागरिकांचा पाठिंबा असून भ्रष्टाचाऱ्यांची मात्र झोप उडाली आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. केंद्र सरकारच्या या निर्णयावरून टीका करणाऱ्या काँग्रेसवर मोदी यांनी टीकास्त्र सोडले. 

नोटाबंदीच्या निर्णयाला सुरवातीला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांनी नंतर मात्र त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार सुरू केल्यानंतर मोदींनी नागरिकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी कालपासून (ता. १३) भाषणांचा सपाटा लावत विरोधकांना लक्ष्य केले आहे. 

आज येथे भाजपच्या परिवर्तन यात्रेदरम्यान, नागरिकांशी संवाद साधताना ते म्हणाले,‘‘नोटा बंद केल्यानंतर गरीब जनतेला आता शांत झोप येत आहे, तर श्रीमंतांची मात्र झोपेच्या गोळ्या मिळविण्यासाठी धावपळ होत आहे. मला गरिबांना होत असलेला त्रास समजत नसल्याची विरोधक टीका करत आहेत; पण मला त्यांचे दु:ख कळते म्हणूनच हा निर्णय घेतला आहे. ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, ते अत्यंत प्रभावशाली असल्याने मला त्रास होऊ शकतो. गरिबांसाठी हा त्रास सहन करायची माझी तयारी आहे.’’ 

नोटांचे हार घालणाऱ्या नेत्यांना आता या नोटा कचऱ्यात फेकाव्या लागत आहेत, असा टोमणाही मोदींनी मारला. तसेच, काही जणांनी पाचशे आणि हजारच्या नोटा गंगेमध्ये टाकल्या असल्या तरी यामुळे त्यांची पापे धुतली जाणार नाहीत, असेही मोदी म्हणाले. 

गांधी घराण्यावर आडून टीका

भाषणाची सुरवात  मोदी यांनी भोजपुरीतूनच केली. नंतर पंतप्रधान नेहरू यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी गांधी घराण्यावर टीका केली. ते म्हणाले की, १९६२ पासून या भागातील नागरिकांच्या बिकट परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. म्हणूनच मी १४ नोव्हेंबरचा दिवस साधून विकासकामे पूर्ण करत आहे. माझ्या निर्णयांमुळे काही पक्ष आणि काही घराणी अडचणीत येत आहेत.

Web Title: Modi criticized the Congress on the left.