मोदीजी, नोकर्‍या कुठे गायब झाल्या? : राहुल गांधी

वृत्तसंस्था
मंगळवार, 12 जून 2018

''पंतप्रधान मोदींनी देशातील बेरोजगार तरुणांना वर्षाला 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले हे आश्वासन पूर्ण केले नाही''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्यांबाबत आज (मंगळवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, ''पंतप्रधान मोदींनी देशातील बेरोजगार तरुणांना वर्षाला 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले हे आश्वासन पूर्ण केले नाही''.

मुंबई येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातील बेरोजगार तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. त्यावर राहुल गांधी यांनी सांगितले, की भाजपशासित सरकारने वर्षात 2 कोटी नोकऱ्या उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण केलेले नाही. तसेच काँग्रेस नेत्यांनी चीनचे उदाहरण देत सांगितले, की चीन दर 24 तासांमध्ये 50,000 तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करुन देत आहे. त्यामुळे भाजप सरकारने या कालावधीत 450 तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करुन द्यायला हव्यात, असेही ते म्हणाले.   

पुढे ते म्हणाले, की 2 कोटी नोकऱ्या वर्षभरात उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पंतप्रधानांकडून देण्यात आले होते. तसेच त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने सांगितले होते, की मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात भारतात बेरोजगारी वाढली. देशातील 15-20 लोकांच्या कर्जासाठी सरकारने अडीच लाख कोटींचे कर्ज दिले. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.

Web Title: Modi didnt keep promise of giving jobs to 2 crore youth in a year says Rahul Gandhi