मोदी सरकार महिलांच्या खात्यात 1 लाख रुपये टाकतंय असा मेसेज आलाय का? वाचा खरं काय

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

केंद्र सरकार स्वयंरोजगार योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात तब्बल एक लाख रुपये जमा करत आहे, असा दावा या मॅसेजमध्ये केला आहे.

नवी दिल्ली : कोरोना काळात सोशल मिडीयातून पसरणाऱ्या अफववांचे पेव हे वाढतच आहे. दररोज काही ना काही दावा केले असलेले मॅसेज हे व्हायरल होतातच. अशाच एका व्हायरल मॅसेजमधील दाव्यामुळे लोकांची दिशाभूल होत आहे. केंद्र सरकार स्वयंरोजगार योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात तब्बल एक लाख रुपये जमा करत आहे, असा दावा या मॅसेजमध्ये केला आहे. परंतु प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोने या व्हायरल मॅसेजच्या सत्यतेची पडताळणी करुन खुलासा केला आहे. 

पीआयबीने हे स्पष्ट केले आहे की, या मॅसेजमध्ये केलेला दावा खोटा आहे. केंद्र सरकारद्वारा महिला स्वयंरोजगारसारखी कोणतीही योजना चालवली जात नाहीये. 

कोरोना काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढतच असताना सोशल मिडीयावर याप्रकारच्या फेक न्यूज या दररोज धुमाकूळ घालत आहेत. परंतु अशा मॅसेजमुळे सामान्य आणि गरजू लोकांची दिशाभूल होत आहे. भारत सरकारच्या प्रेस इन्फोर्मेशन ब्यूरोने या व्हायरल बातमीचे खंडन केले आहे. सरकार याप्रकारची कसलीही योजना राबवत नाहीये, असा निर्वाळाही दिला आहे. याप्रकारच्या खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी भारत सरकारने याआधीही खूप प्रयत्न केले आहेत. 

हेही वाचा - रेल्वे 21 सप्टेंबरपासून सोडणार क्लोन ट्रेन्स; प्रवाशांना मिळणार दिलासा

PIB Fact Check द्वारे केंद्र सरकारची धोरणे, योजना, विभाग आणि मंत्रालयांशी निगडीत दिशाभूल करणाऱ्या आणि खोट्या बातम्यांना आळा घालण्याचे काम केले जाते. सरकारशी निगडीत एखादी बातमी खरी आहे खोटी हे जाणून घेण्यासाठी PIB Fact Check ची मदत घेतली जाते. एखाद्या संशयास्पद बातमीची सत्यासत्यता तपासण्यासाठी आणि खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी संशयास्पद बातमीचा स्क्रिनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL या +91 8799711259 व्हॉट्सअॅप नंबरवर अथवा pibfactcheck@gmail.com या मेलवर कुणाही व्यक्तीला पाठवता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Modi Government depositing Rs1 lakh rupees women account under pm mahila swarojgar yojana