'मोदी सरकार पुढच्या सरकारसाठी मोठं बिलं करुन ठेवणार'

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 जानेवारी 2019

''केंद्रातील मोदी सरकार स्वतःकडे उपलब्ध असलेल्या निधीपेक्षा अधिक रकमेचा खर्च करत आहे आणि अशा पद्धतीने खर्च करुन मोदी सरकार पुढच्या सरकारसाठी मोठ्या रकमेच्या बिलाची रक्कम मागे ठेऊन जाणार आहे''.

- पी. चिदंबरम, ज्येष्ठ नेते, काँग्रेस.

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार स्वतःकडे उपलब्ध असलेल्या निधीपेक्षा अधिक रकमेचा खर्च करत आहे आणि अशा पद्धतीने खर्च करुन मोदी सरकार पुढच्या सरकारसाठी मोठ्या बिलाची रक्कम मागे ठेऊन जाणार आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारवर आज (मंगळवार) ट्विटरवरून टीकास्त्र सोडले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यानंतर आता चिदंबरम यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

ते म्हणाले, ''भाजपकडून अनेक पाऊलं अचानक उचलली जात आहेत. मात्र, यासाठी लागणारा पैसा आहे तरी कुठे?, असे मी यापूर्वीही सांगितले आहे. केंद्रातील भाजप सरकार स्वतःकडे असलेल्या निधीपेक्षा अधिक खर्च करेल आणि पुढच्या सत्ताधाऱ्यांसाठी ही बिलं मागे ठेऊनच ते जाणार आहेत''. 

Web Title: Modi government makes big bills for next government Says P Chidambaram