'मोदी सरकारची 'एक्सपायरी डेट' जवळ आलीये'

'मोदी सरकारची 'एक्सपायरी डेट' जवळ आलीये'

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या काळात देशातील जनतेला 'अच्छे दिन' आलेले नाहीत. त्यामुळे आता भाजपला सर्व राज्यांतून हद्दपार करायचे आहे. देशातील जनतेने भाजपला घरी बसवण्याचा निर्धार केला आहे, असे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले. तसेच आता मोदी सरकारची 'एक्सपायरी डेट' जवळ आली आहे, असेही त्या म्हणाल्या.

ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथे आज (शनिवार) केंद्र सरकारविरोधात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मोदी सरकारविरोधात आयोजित सभेत तब्बल 22 पक्षांनी हजेरी लावली आणि विरोधकांची एकजूट दाखवली. त्यावेळी ममता बॅनर्जी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ''मोदी सरकारच्या काळात देशातील जनतेला 'अच्छे दिन' आलेले नाहीत. त्यामुळे आता भाजपला सर्व राज्यांतून हद्दपार करायचे आहे. आता मोदी सरकारची 'एक्सपायरी डेट' जवळ आली आहे''.

दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला म्हणाले, स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाल्यानंतर देशासमोर आता एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. भाजपला संपविण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र आले पाहिजे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com