मोदी मोहम्मद बिन तुघलकाचे सरकार : काँग्रेस

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारची तुलना सुलतान मोहम्मद बिन तुघलकाशी केली आहे.

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयांमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी मोदी सरकारची तुलना सुलतान मोहम्मद बिन तुघलकाशी केली आहे.

वृत्तसंस्थेशी बोलताना खर्गे म्हणाले, "कोणताही विचार न करता दररोज येणाऱ्या नव्या आदेशामुळे सरकार दररोज गोंधळाचे वातावरण निर्माण करून नागरिकांना त्रस्त करत आहे. हे सरकार म्हणजे मोहम्मद बिन तुघलकाचे सरकार आहे. अंतिमत: देशातील नागरिक त्रस्त आहेत आणि सरकार धोरणांची अंमलबजावणी करण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे आलेल्या अस्वस्थतेतूनच सरकार आदेश काढत आहे.' त्यामुळेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांनी नोटाबंदीचा हा निर्णय म्हणजे अत्यंत गैरव्यवस्थापनाचा आहे, असेही खर्गे यांनी यावेळी सांगितले. तुघलक नावाच्या राज्यकर्त्याने त्याची राजधानी दिल्लीवरून दौलताबादला हलविण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती आणि त्याला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी गुजरातमधील मेहसाणा येथे झालेल्या जाहीर सभेत मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. नोटाबंदीच्या माध्यमातून गरिबांना लक्ष्य केले जात असून, हा निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विरोधात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Web Title: Modi govt. is like Mohammed bin Tughlaq regime: Kharge