'नेत्यांच्या अटकेसाठी मोदी यंत्रणेचा 'ओव्हरटाईम'

वृत्तसंस्था
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यंत्रणा आम आदमी पक्षाच्या आमदारांना खोट्या आरोपांमध्ये गोवण्यासाठी जादा काम (ओव्हरटाईम) करत असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. 

केजरीवाल यांनी ट्‌विटरद्वारे म्हटले आहे की, "आश्‍चर्य आहे. एकाच वेळी मोदी यांनी उरी संदर्भात काम करायला पाहिजे. तर त्यांची यंत्रणा आम आदमी पक्षाच्या आमदारांना चुकीच्या प्रकरणांमध्ये गोवण्यासाठी ओव्हरटाईम करत आहेत.‘ आमद आदमी पक्षाचे आमदार सोमनाथ भारती यांना आज (गुरुवार) "एम्स‘मधील सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आजच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. तर बुधवारी महिला आयोगातील गैरव्यवहारप्रकरणाच्या "एफआयआर‘मध्ये केजरीवाल यांचा नावाचा समावेश करण्यात आला आहे.

Web Title: modi govt's overtime for leaders' arrests

टॅग्स