मोदींच्या हस्ते ईस्टर्न पेरिफेरल व दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचे उद्घाटन 

वृत्तसंस्था
रविवार, 27 मे 2018

दिल्ली : दिल्ली ते मेरठ या 9 किमी एक्सप्रेसवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यातील 6 किमी मोदी यांनी रोड शोही केला. यावेळी हजारो नागरिकांनी मोदांच्या रोड शो ला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. उद्धाटनापुर्वी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदींना सादरीकरणाद्वारे संपुर्ण प्रकल्पाची माहिती दिली. 8.36 किमी लांबीच्या एक्सप्रेसवेसाठी 841.50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. निजामुद्दीन ब्रिज पासून सुरू होणाऱ्या रस्त्यावर दिल्ली-उत्तर प्रदेश हद्दीपर्यंत 14 लेन आहेत. हा देशातील पहिला असा राष्ट्रीय महामार्ग आहे जिथे प्रदुषण कमी होणार आहे.

दिल्ली : दिल्ली ते मेरठ या 9 किमी एक्सप्रेसवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यातील 6 किमी मोदी यांनी रोड शोही केला. यावेळी हजारो नागरिकांनी मोदांच्या रोड शो ला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. उद्धाटनापुर्वी रस्ते व वाहतूक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोदींना सादरीकरणाद्वारे संपुर्ण प्रकल्पाची माहिती दिली. 8.36 किमी लांबीच्या एक्सप्रेसवेसाठी 841.50 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. निजामुद्दीन ब्रिज पासून सुरू होणाऱ्या रस्त्यावर दिल्ली-उत्तर प्रदेश हद्दीपर्यंत 14 लेन आहेत. हा देशातील पहिला असा राष्ट्रीय महामार्ग आहे जिथे प्रदुषण कमी होणार आहे. एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूला 2.5 मीटर लांबीचे सायकल ट्रॅकही बनविण्यात आले आहेत.

यानंतर 135 किलोमीटर अंतराचा ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेसवेचे उद्घाटनही मोदींच्या हस्ते करण्यात आले. या एक्सप्रेसवेसाठी तब्बल 11 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या एक्सप्रेसवेमुळे हरियाणा मधील कुंडली आणि पलवलचे अंतर चार तासांवरून केवळ 72 मिनीटांवर आले आहे.

Web Title: Modi inaugurates Eastern Peripheral and Delhi-Meerut Expressway