मोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही

वृत्तसंस्था
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे, यासाठी ही पावले उचलली जात आहेत. 

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे, यासाठी ही पावले उचलली जात आहेत. 

भारत-पाकिस्तानमध्ये शांततापूर्ण चर्चा होणे व चांगले संबंध प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे मत पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान इम्रान खान यांनीही यापूर्वी भारताच्या राजदूतांसमोर मांडले होते. त्यानंतर इम्रान खान यांचा शपथविधी झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी अभिनंदनपर पत्र पाठवले होते. यात त्यांनी भारत-पाक संबंधाबाबत चर्चा करणे गरजेचे आहे, असे लिहिले आहे, असा दावा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी केला.  

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, दोन्ही देशांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. आपण शेजारी राष्ट्र असल्याने वाद न करता शांततेत चर्चेशिवाय पर्याय नाही. हे वाद असले तरी, संवादाच्या प्रक्रियेला सुरवात केली पाहिजे. यासाठीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेची तयारी दर्शवल्याचा दावाही त्यांनी केला.

पाकिस्तानच्या या दाव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. यात चर्चेबाबतच्या प्रस्तावाचा उल्लेख नव्हता.

Web Title: modi invites imran khan for discussion