मोदी-जिनपिंग भेटीतून काय साधले? 

वृत्तसंस्था
रविवार, 10 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीसाठी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. सहा आठवड्यांत दुसऱ्यांदा त्यांचा चीन दौरा होत आहे. डोकलामवरून वाढलेला तणाव, भारताचा मित्र मालदीवमध्ये चीनचा शिरकाव, अरुणाचल प्रदेशात आपला पायाभूत सुविधांचा विस्तार आणि चीनची तिखट प्रतिक्रिया अशा घटना, घडामोडी घडत असताना मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग वरचेवर भेटत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) बैठकीसाठी चीनच्या दौऱ्यावर गेले आहेत. सहा आठवड्यांत दुसऱ्यांदा त्यांचा चीन दौरा होत आहे. डोकलामवरून वाढलेला तणाव, भारताचा मित्र मालदीवमध्ये चीनचा शिरकाव, अरुणाचल प्रदेशात आपला पायाभूत सुविधांचा विस्तार आणि चीनची तिखट प्रतिक्रिया अशा घटना, घडामोडी घडत असताना मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग वरचेवर भेटत आहेत. या भेटीनिमित्ताने आतापर्यंतच्या वाटचालीवर टाकलेला प्रकाश ः 

- मे 2014 ः मोदी पंतप्रधान झाल्यानंतर चीनकडून स्वागत. 
- जुलै 2014 ः "ब्रिक्‍स' परिषदेनिमित्ताने पहिल्यांदा मोदी यांची जिनपिंग यांच्याशी ब्राझीलमधील फोर्तालेझा येथे भेट. दीड तास चर्चा. 
- 17-19 सप्टेंबर 2014 ः जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी पेंग ल्यूऑन यांचे अहमदाबादेत आगमन. आगामी पाच वर्षांत 20 अब्ज डॉलर भारतात गुंतवणुकीचे चीनचे आश्‍वासन. 12 करार. 
- 14, 15 मे 2015 ः अहमदाबादप्रमाणेच जिनपिंग यांचे गाव असलेल्या जियान (शांक्‍सी प्रांत) येथे मोदींचे जंगी स्वागत. पहिल्यांदा जागतिक नेता जिनपिंग यांच्या गावी. मोदींची बीजिंग, शांघायला भेट. 
- 8 जुलै 2015 ः रशियातील उफा येथे (एससीओ) आणि "ब्रिक्‍स' बैठकीदरम्यान मोदी-जिनपिंग चर्चा. पाकिस्तानच्या दहशतवादधार्जिण्या धोरणाला चीनकडून अप्रत्यक्ष पाठिंब्याबाबत नाराजी व्यक्त 
- 4 जुलै 2015 ः उझबेकिस्तानमधील ताश्‍कंद येथे "एससीओ' बैठकीनिमित्ताने मोदी-जिनपिंग चौथ्यांदा भेट. याचदरम्यान भारताची आण्विक पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी मोर्चेबांधणी सुरू होती. चीनचा सातत्याने विरोध. 
- 4 सप्टेंबर 2016 ः "जैश'चा म्होरक्‍या मसूद अझहरवर बंदीचा राष्ट्रसंघाचा सुरक्षा परिषदेतील प्रयत्न, भारताचा "एनएसजी' प्रवेश यांना चीनच्या विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर मोदी-जिनपिंग भेट. मोदींकडून पाकव्याप्त काश्‍मीरमधील चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरबद्दल चिंता व्यक्त 
- 5 सप्टेंबर 2017 ः डोकलाम संबंधाच्या पार्श्‍वभूमीवर मोदींचा "ब्रिक्‍स' परिषदेसाठी तिसरा चीन दौरा. तासभर चर्चा. यावेळी पहिल्यांदा चीनने "जैश', हक्कानी नेटवर्क, "लष्कर'ला दहशतवादी संबोधण्यावरून हरकत घेतली नाही 
- 26-28 एप्रिल 2018 ः डोकलामचा मुद्दा डोक्‍यात ठेवूनच उभय नेत्यांनी चीनच्या मध्यवर्ती भागातील वुहान येथे आपापल्या लष्कराला संवाद भक्कम करणे आणि विश्‍वासाचे वातावरण वाढविण्याच्या सूचना देण्याचे ठरविले; पण एकही करार झाला नाही. घोषणाही नाही. 
(सकाळ संशोधन आणि विकास विभाग) 

Web Title: Modi-Jinping meeting