सिंगापूरच्या बंद खोलीत मोदी-मॅटिस यांची चर्चा

पीटीआय
रविवार, 3 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांच्यात आज चर्चा झाली. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदी-मॅटिस यांची बंद खोलीत चर्चा झाली. या भेटीत परस्पर सहकार्य आणि जागतिक हित यासंबंधीच्या सुरक्षाविषयक मुद्‌द्‌यावर चर्चा झाली. या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलदेखील उपस्थित होते. ही बैठक तासभर चालली. 

सिंगापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे संरक्षणमंत्री जिम मॅटिस यांच्यात आज चर्चा झाली. तीन देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात मोदी-मॅटिस यांची बंद खोलीत चर्चा झाली. या भेटीत परस्पर सहकार्य आणि जागतिक हित यासंबंधीच्या सुरक्षाविषयक मुद्‌द्‌यावर चर्चा झाली. या वेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलदेखील उपस्थित होते. ही बैठक तासभर चालली. 

मोदी आणि मॅटिस यांची भेट शांग्रिला डायलॉग येथे झाली. या बैठकीत शांग्रिला डायलॉग येथे दोन्ही नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेवर चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते रविशकुमार यांनी ट्विट करत या भेटीची माहिती दिली. शांग्रिला डायलॉग येथे काल बोलताना आपापसांतील स्पर्धेमुळे आशियाई देशाची पीछेहाट होईल, तर सहकार्याच्या जोरावर चालू शतकाचे चित्र बदलू शकेल, असे मोदी यांनी म्हटले होते. या मुद्‌द्‌यावर मॅटिस भेटीत भर राहिला. भारत आणि चीन परस्पर सहकार्य ठेवत विश्‍वासाने एकत्र काम करतील तेव्हाच आशिया आणि जगाचे भवितव्य उज्ज्वल होईल.

आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार समुद्र, हवा, पाणी याचा वापर करण्याचा सर्वांना समान अधिकार असायला हवा. यानुसार नौकाविहाराचे स्वातंत्र्य, सुरक्षित व्यापार आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वादग्रस्त मुद्दे शांततेने निकाली काढावेत, असेही मोदी म्हणाले. मॅटिस यांनीदेखील काल आपल्या भाषणात सर्वांसाठी स्वातंत्र्य आणि व्यवस्थेवर आधारित नियमांवर भर दिला होता. दोन्ही नेत्यांची आजची बैठक महत्त्वाची मानली जात आहे. इंडो-पॅसेफिक क्षेत्रात दोन्ही देशांना शांतता आणि सुरक्षा निश्‍चित करण्यासाठी एकत्र येण्याची आणि अन्य देशांच्या सहकार्याने काम करणे गरजेचे असल्याचे मॅटिस यांनी म्हटले आहे. तसेच, समुद्री मार्ग सर्व देशांसाठी खुले असावेत, असेही त्यांनी नमूद केले. 

Web Title: Modi-Matis's discussion in a closed room in Singapore