लघुशंका करून मंत्र्यानेच फासला 'स्वच्छ भारत'ला हरताळ

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 जून 2017

बिहार दौऱ्यावर असताना राधामोहनसिंह रस्त्यावर लघुशंका करताना दिसले. त्यांच्या बाजूला सुरक्षा रक्षकही असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. राधामोहनसिंह यांचा हा फोटो कधी काढला आहे आणि केव्हाचा आहे हे स्पष्ट झालेले नाही.

पाटणा - एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना स्वच्छ भारत अभियानाचे धडे देत असताना, दुसरीकडे केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह रस्त्यावरच लघुशंका करताना दिसले. राधामोहनसिंह यांचा फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

बिहार दौऱ्यावर असताना राधामोहनसिंह रस्त्यावर लघुशंका करताना दिसले. त्यांच्या बाजूला सुरक्षा रक्षकही असतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. भिंतीच्या शेजारी उभे राहून राधामोहनसिंह लघुशंका करत आहेत आणि सुरक्षा रक्षक बंदूक घेऊन आपले कर्तव्य बजावत असल्याचा हा फोटो आहे. राधामोहनसिंह यांचा हा फोटो कधी काढला आहे आणि केव्हाचा आहे हे स्पष्ट झालेले नाही. या फोटोवरून सोशल मिडीयावर राधामोहनसिंह यांची खिल्ली उडविण्यात येत आहे.

पंतप्रधान मोदींकडून गेल्या तीन वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानाचा जोरदार प्रचार करण्यात येत आहे. अन् त्यांचेच मंत्री अशी लघुशंका करताना आढळले आहे. गावांमध्ये शौचालय उभारण्यासाठी केंद्र सरकारकडून मदतही करण्यात येत आहे. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :
इंद्राणी मुखर्जीलाही कारागृहात मारहाण झाल्याचे स्पष्ट
मोदी पाकला गेले तेव्हाच लष्कराचे धैर्य खचले- आझम खान​

राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकरांच्या समर्थकांची उचलबांगडी
बुलडाणा: मलकापूरमध्ये गोळीबार; एक गंभीर जखमी
दोनशेच्या नोटांची छपाई सुरू
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मंजुरी​
ठाणे: स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ​
कर्जमाफीसाठी निकषांची जंत्री; काही अटींमुळे अडसर शक्य​
सातारा: भाजप जिल्ह्याध्यक्षांच्या भावावर गोळीबार​
राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही तत्त्वाची लढाई : सोनिया गांधी

Web Title: Modi minister mocks Swachh Bharat Abhiyan, urinates in full public view; pic goes viral