'संघासाठी मोदी पिंडीवरील विंचू'

'संघासाठी मोदी पिंडीवरील विंचू'

बंगळूर : वाद्‌ग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा रा. स्व. संघातील नेत्याच्या वक्तव्याचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पंतप्रधान मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महादेवाच्या पिंडीवरील विंचू आहेत, ज्याला हटवताही येत नाही आणि चपलेनेही ठेचता येत नाही. या विंचवाला हात लावला, तर तो दंश करण्याचा धोका आहे, असे मत संघातील एका बड्या नेत्याने एका पत्रकाराशी खासगीत बोलताना व्यक्त केल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.
 
बंगळूर येथील "बंगळूर लिटरेचर फेस्टिव्हल'मध्ये सहभागी झालेल्या थरूर यांनी त्यांचे पुस्तक "द पॅराडॉक्‍सियल प्राईम मिनिस्टर'वर भाष्य करताना उपरोक्त निरीक्षण नोंदविले. 
दरम्यान, थरूर यांच्या वक्तव्यावर नेटिझन्सनी जोरदार टीका करीत नापसंती व्यक्त केली.

मोदींचे व्यक्तीस्तोम संघातील अनेक नेत्यांना खटकू लागले असून, मोदीत्व, मोदी प्लस हिंदुत्व यामुळे ते संघापेक्षाही मोठे ठरले आहेत. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या प्रमुखांना कधी हटविले जाणार, हे केंद्रीय गृहमंत्र्यांनादेखील माहिती नसते. या सरकारमध्ये परराष्ट्रमंत्र्यांना परकी धोरण आणि संरक्षणमंत्र्यांना राफेल कराराबाबत शेवटपर्यंत माहिती नसते, अशी टीका थरूर यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com