मोदीजी, वैयक्तिक हल्ल्यापेक्षा तत्त्वांवर मते मिळवा: काँग्रेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैयक्तिक हल्ला करण्यापेक्षा तत्त्वांवर मते मिळविण्याचा सल्ला दिला आहे.

गुजरातच्या पर्यटनासंदर्भातील एका जाहिरातीवर टीका करताता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी एका प्रचारसभेत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी गुजरातमधील गाढवांची जाहिरात न करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर मोदी यांनी प्रचारसभेत बोलताना उत्तर प्रदेशमध्ये 2013 साली गाढवाचे चित्र असलेले टपालतिकिटे छापल्याची आठवण करून दिली होती.

या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे. वृत्तसंस्थेशी बोलताना काँग्रेस नेते द्विजेंद्र त्रिपाठी म्हणाले, "लोकांनी लोकसभा 2014 मध्ये मोदींना मतदान केले. मोदी जे काही करत आहेत, त्यावर बोलण्याचेही आपल्याला स्वातंत्र्य नाही. ज्यांनी मोदी यांना मतदान केले आहे, त्यांना विश्‍वासघात झाल्यासारखे वाटत आहे.'

Web Title: Modi should seek votes on principles instead of launching personal attacks: Congress