मोदी निवडणुकांनंतर पाच देशांच्या दौऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी मे आणि जून महिन्यात पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामध्ये श्रीलंका, जर्मनी, स्पेन, रशिया आणि कझाकिस्तान यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपान दौऱ्यानंतर  एकही परदेश दौरा केलेला नाही. गेल्या काही महिन्यांमध्ये मोदी संसदेचे अधिवेशन आणि नंतर पाच राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त होते. आता पाच राज्यांच्या निवडणुकांचा प्रचार संपताच मोदींच्या परदेश दौऱ्याला सुरवात होणार आहे. 

संयुक्त राष्ट्राचा वेसाक दिन साजरा करण्यासाठी 12 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीलंकेत उपस्थित राहणार आहेत. संयुक्त राष्ट्रातर्फे दरवर्षी बौद्ध बहुसंख्य देशांमध्ये वेसाक दिन साजरा केला जातो. या वर्षी या उत्सवाचे यजमानपद श्रीलंका भुषवणार आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मोदी जर्मनी, स्पेन व रशिया या देशांच्या दौऱ्यावर असणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मोदी कझाकिस्तानला भेट देणार आहेत.

या वर्षी भारत आणि रशियाच्या राजनैतिक संबंधाना 70 वर्षे पूर्ण होत आहेत. रशिया भेटी दरम्यान मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे कायम सदस्यत्व मिळवण्यासाठी ही भेट महत्त्वाची आहे.

जर्मनीची भारतातील गुंतवणुक वाढवण्याच्या दृष्टीने नरेंद्र मोदींची बर्लीन भेट महत्त्वाची ठरणार आहे. भारताच्या मेक इन इंडिया कार्यक्रमास जर्मनीचा मोठ्या प्रमाणावर हातभार असणार आहे.जर्मनी भारतातील सातव्या क्रमांकाचा गुंतवणुकदार आहे व भारतातील एकुण परराष्ट्रीय गुंतवणुकीपैकी तीन टक्के गुंतवणुक जर्मन कंपन्यांची आहे.

Web Title: modi to visit 5 nations in May-June