मोदींनी पूर्ण केले विराटचे फिटनेस चॅलेंज, पुढील चॅलेंज कुमारस्वामींना

वृत्तसंस्था
बुधवार, 13 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओमध्ये, सकाळी सात वाजता आपल्या लोकनियंत्रित लोककल्याण मार्ग या निवासस्थानी असलेल्या ठिकाणी प्राणायमासह विविध प्रकारचे योग व्यायाम करताना दिसत आहेत.

कुमारस्वामीना आव्हान पंतप्रधान मोदींनी त्यांची फिटनेस चॅलेंजचा व्हिडिओ केला 

नवी दिल्ली : विराट कोहलीने आपल्या ट्विटरवरून #FitnessChallenge हे हॅशटॅग वापरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व्यायामाचा व्हिडीओ शेअर करण्याचे आव्हान दिले होते. त्यानंतर आज सकाळी पंतप्रधान मोदींनी ते आव्हान स्वीकारून पुढे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी, राष्ट्रकुल पदकविजेती टेनिसपटू मनिका बत्रा आणि 40 पेक्षा अधिक भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना आव्हान दिले. 

कर्नाटक येथे भाजपच्या सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना विरोध करून कुमारस्वामी यांनी कॉंग्रेसबरोबर युती करून कर्नाटक येथे सरकार स्थापन केले. यामुळे आता नरेंद्र मोदींनी ट्विट केलेल्या व्हिडिओ वरून नवीन राजकीय चर्चा होऊ शकते. संयुक्त जनता दल (संयुक्त जनता) आणि जनता दल सेक्युलर-कॉंग्रेसच्या आघाडीने 2019 ची निवडणूक लढवण्याचे ठरले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिडिओमध्ये, सकाळी सात वाजता आपल्या लोकनियंत्रित लोककल्याण मार्ग या निवासस्थानी असलेल्या ठिकाणी प्राणायमासह विविध प्रकारचे योग व्यायाम करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देखील ट्विट केले की,  "येथे मी  सकाळी  व्यायाम करत आहे. योगाव्यतिरिक्त, मी पृथ्वी, जल, अग्नी, वायु, आकाश या पंचतत्व किंवा प्रकृतिच्या 5 घटकांपासून प्रेरणा घेतलेल्या एका पैलूत चालतो. मी श्वासोच्छवासाचा सराव देखील करतो. #HumFitTohIndiaFit या हॅशटॅगने त्यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. 

केंद्रीय मंत्री राघवेंद्र राठोड यांनी या फिटनेस चॅलेंजची सुरूवात केली होती. मोदी सरकारने याआधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर योगासने करुन योगाचे महत्त्व अधोरेखित केले होते. 2015 मध्ये भारताने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दोन जागतिक विक्रम नोंदविले जेव्हा पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील राजपथ येथे सहभाग घेतला आणि 35985 लोकांना यात सहभागी करुन घेतले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: modic completes challenge from virat kohali and gives challenge to kumarswamy