esakal | मोदीजी, नोटांवरुन गांधींना हटवा; काँग्रेस आमदाराची मागणी चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

मोदीजी, नोटांवरुन गांधींना हटवा; काँग्रेस आमदाराची मागणी चर्चेत

या काँग्रेस आमदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलंय आणि आपली मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. त्याची ही मागणी सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

मोदीजी, नोटांवरुन गांधींना हटवा; काँग्रेस आमदाराची मागणी चर्चेत

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : पाचशे आणि एक हजारच्या नोटा जेंव्हा एकाएकी बंद करण्यात आल्या होत्या, तेंव्हा देशात मोठा गदारोळ माजला होता. मोदी सरकारने घेतलेला हा निर्णय चांगलाच वादग्रस्त ठरला होता. या निर्णयावर आजही जोरदार टीका केली जाते. मात्र, आता नोटामध्ये एक महत्त्वाचा बदल करण्याची मागणी केलीय ती चक्क एका काँग्रेसच्या आमदराने... या काँग्रेस आमदाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहलंय आणि आपली मागणी मान्य करण्याची विनंती केली आहे. त्याची ही मागणी सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा: हिंमत असेल तर समोर या! काश्मीरी पंडिताच्या मुलीचं दहशतवाद्यांना खुलं आव्हान

काँग्रेस आमदाराने पंतप्रधान मोदींना पत्र लिहून मागणी केलीय की, पाचशे आणि दोन हजारच्या नोटांवरुन महात्मा गांधीचं चित्र काढून टाकलं जावं. नोटांवर महात्मा गांधींचं चित्र नको, अशी ही मागणी आहे आणि ती चक्क काँग्रेस आमदाराने केल्यामुळे त्यावर चर्चा होतेय. पाचशे आणि दोन हजारच्या नोटांचा वापर हा भ्रष्टाचारामध्ये तसेच बारमध्ये केला जातो. त्यामुळे गांधींचा फोटो नोटांवर नको, अशी या आमदाराची मागणी आहे.

राजस्थानमध्ये भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे लक्ष वेधून राज्यातील सत्ताधारी पक्षाचे आमदार भरत सिंह कुंदनपूर यांनी म्हटलं की, जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2020 च्या दरम्यान एकूण 616 भ्रष्टाचाराची प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. म्हणजे दररोज सरासरी दोन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

हेही वाचा: अरुणाचल सीमेवर चीनचा घुसखोरीचा प्रयत्न; भारताने पाडला हाणून

त्यामुळे या आमदाराने नुकत्याच साजऱ्या झालेल्या गांधींच्या 152 व्या जयंतीला पंतप्रधान मोदींना एक पत्र लिहलंय आणि नोटांवरुन महात्मा गांधींना हटवण्याची मागणी केलीय. पुढे आमदाराने म्हटलंय की, गांधींचा फोटो केवळ लहान नोटा जसे की 2, 5, 10, 20, 100 आणि 200 रुपयांच्या नोटांवरच असायला हवा. कारण याचा वापर गरीब वर्गातील लोक करतात आणि गांधींनी केवळ वंचितांसाठी काम केलं आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, मोठ्या नोटांवर गांधींच्या चश्म्याचा फोटो अथवा अशोक चक्राचा वापर केला जाऊ शकतो.

loading image
go to top