'मोदींची 56 इंच छाती झाली शंभर इंच'

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑक्टोबर 2016

भोपाळ : पाकव्याप्त काश्‍मिरमध्ये घुसून भारताने केलेल्या "सर्जिकल स्ट्राईक‘मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 56 इंच छाती 100 इंच झाली असल्याची प्रतिक्रिया मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौव्हान यंनी केली आहे.

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रासंदर्भातील एका अधिवेशनात चौहान बोलत होते. ते म्हणाले, "लष्कराचे अभिनंदन. नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन. आता 56 इंच छाती 100 इंच झाली आहे.‘ तसेच "चीनपेक्षा भारताचा विकास दर अधिक आहे. तुम्ही सारे लवकरच भारत हा समर्थ झाल्याचे पाहू शकाल. मोदी यांच्या सक्षम नेतृत्त्वाखाली देशात विकास कार्यक्रम होत आहेत. मध्य प्रदेशचा विकास दर हा भारतात सर्वाधिक असून शेती संदर्भातील राज्यातील विकासदर हा जगातील सर्वाधिक विकासदर आहे. एकेकाळी वीजटंचाईला सामोरे जाणारे राज्याकडे आता अतिरिक्त वीज आहे‘, असेही चौव्हान पुढे म्हणाले.

Web Title: Modi's '56-inch chest' is now 100-inch - shivrajsingh