87 अब्ज डॉलर्सच्या भगीरथ "नदीजोडणी प्रकल्पा'स प्रारंभ!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्‍यक पाऊले उचलण्यासाठी पंतप्रधानांनी व्यक्तिश: पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या प्रकल्पामुळे लक्षावशी हेक्‍टर जमीन ओलिताखाली येण्याबरोबरच हजारो मेगावॅट वीजनिर्मितीही करणे शक्‍य होणार आहे

दौधान - भारतामधील महत्त्वपूर्ण नद्या जोडण्यासंदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास या महिन्याभरात प्रारंभ होणार असल्याचे संवेदनशील वृत्त सूत्रांनी दिले आहे. या प्रचंड प्रकल्पाची किंमत सुमारे 87 अब्ज डॉलर्स इतकी होण्याची शक्‍यता आहे.

देशातील काही भागांत पूरस्थिती व काही भागांत पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी परिस्थिती नष्ट करुन सर्व भागांत पाणी फिरविण्याचे मुख्य उद्दिष्ट या प्रकल्पांतर्गत आखण्यात आले आहे.

या योजनेन्वये देशातील सुमारे 60 नद्या जोडण्यात येणार आहेत. यामध्ये अर्थातच देशातील अत्यंत महत्त्वपूर्ण नदी असलेल्या गंगाचाही समावेश आहे. सध्या केवळ मॉन्सूनवर अवलंबून असलेल्या शेतकरी वर्गातील बहुसंख्यांक घटकास या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळेल, अशी सरकारला आशा आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्‍यक पाऊले उचलण्यासाठी पंतप्रधानांनी व्यक्तिश: पुढाकार घेतल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. या प्रकल्पामुळे लक्षावशी हेक्‍टर जमीन ओलिताखाली येण्याबरोबरच हजारो मेगावॅट वीजनिर्मितीही करणे शक्‍य होणार आहे.

पहिल्या टप्प्यांतर्गत उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश राज्यांतून वाहणाऱ्या कर्णावती व बेतवा या नद्या जोडण्यात येणार आहेत. दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची (भाजप) सरकारे सत्तेवर आहेत. हा प्रकल्प इतर नद्या जोडणी प्रकल्पांसाठी पथदर्शक प्रकल्प ठरेल, अशी सरकारची धारणा आहे.

राज्य मार्गावरील दारूविक्रीचा मार्ग खुला
भाजपच्या विरोधात शिवसेनेचा 'निष्ठावंत' फॉर्म्युला
नोटाबंदीचा लाभ झाल्याचा दावा; संशयास्पद व्यवहार उघड
सुनील अरोरा नवे निवडणूक आयुक्त; राजीव महर्षी 'कॅग'
सुज्ञ कोल्हापूरकर...!
उजनीचे पाणी पंढरपुरात
इमारतींच्या पुनर्विकासाचा आराखडा सरकारकडे नाही!
दक्षिण मुंबईतील इमारत कोसळून 21 ठार; 12 जखमी
मुंबईतील पावसाच्या बळींची संख्या नऊवर

Web Title: Modi's $87 billion river-linking scheme set to take off