मोदींच्या भारतात ईव्हीएममध्ये 'अदृश्य शक्ती' : राहुल गांधी

वृत्तसंस्था
शनिवार, 8 डिसेंबर 2018

''मध्य प्रदेशात निवडणुका पार पडल्यानंतर ईव्हीएम मशिन्स घेऊन जाणारी एक स्कूल बस काही लोकांनी गायब केली. ईव्हीएम मशिन्स घेऊन जाणारी ही बस दोन दिवस गायब होती. त्यामुळे यावरून हे लक्षात येते, की मोदी सरकारच्या भारतात ईव्हीएममध्ये 'अदृश्य शक्ती' आहे''.

- राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष

नवी दिल्ली : ''मध्य प्रदेशात निवडणुका पार पडल्यानंतर ईव्हीएम मशिन्स घेऊन जाणारी एक स्कूल बस काही लोकांनी गायब केली. ईव्हीएम मशिन्स घेऊन जाणारी ही बस दोन दिवस गायब होती. त्यामुळे यावरून हे लक्षात येते, की मोदी सरकारच्या भारतात ईव्हीएममध्ये 'अदृश्य शक्ती' आहे'', अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (शनिवार) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरवरून निशाणा साधला.

मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, मिझोराम आणि छत्तीसगड या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यादरम्यान मध्य प्रदेशातील निवडणुका झाल्यानंतर ईव्हीएम मशिन्स घेऊन जाणारी बस गायब झाल्याचे समोर आले. ही बस दोन दिवस गायब होती. त्यावरून आज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर ट्विटरवरून टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, "काँग्रेस कार्यकर्त्यांनो, आता जागरुक राहण्याची वेळ आली आहे. मध्य प्रदेशात निवडणुका पार पडल्यानंतर ईव्हीएम मशिन्स घेऊन जाणारी एक स्कूल बस काही लोकांनी गायब केली. ईव्हीएम मशिन्स घेऊन जाणारी ही बस दोन दिवस गायब होती. त्यामुळे यावरून हे लक्षात येते, की मोदींच्या भारतात ईव्हीएममध्ये अदृश्य शक्ती आहे''.

दरम्यान, या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येत्या 11 डिसेंबरला येणार आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.

Web Title: In Modis India the EVMs have mysterious powers says Congress President Rahul Gandhi