'तो' अधिकारच पाकिस्तानला नाही- मोहम्मद कैफ

वृत्तसंस्था
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्याकांबरोबर कसे वागायचे हे शिकवू, असे वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने चांगलीच चपराक लगावली आहे. अल्पसंख्यांक लोकांसोबत कसे वागायचे हे शिकविण्याचा अधिकार पाकिस्तानने गमावला असल्याचेही त्याने म्हटले आहे.

नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अल्पसंख्याकांबरोबर कसे वागायचे हे शिकवू, असे वक्तव्य करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने चांगलीच चपराक लगावली आहे. अल्पसंख्यांक लोकांसोबत कसे वागायचे हे शिकविण्याचा अधिकार पाकिस्तानने गमावला असल्याचेही त्याने म्हटले आहे.

कैफने इम्रान खान यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांची आकडेवरीच त्यांना ऐकवली आहे. कैफ आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, भारत-पाकिस्तान फाळणी झाली होती त्यावेळी पाकिस्तानमध्ये 20 टक्के अल्पसंख्यांक होते. आज हाच आकडा केवळ दोन टक्क्यावर आला आहे. पुढे बोलताना भारतामधील अल्पसंख्यांकांची संख्या वाढल्याचेही कैफने म्हटले आहे. शेवटी त्याने म्हटले आहे की, अल्पसंख्यांकाना कसे वागवावे याबद्दल भाष्य करायचे झाल्यास पाकिस्तान हा देशातील शेवटचा देश असेल जे याबद्दल बोलू शकतील, असे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बुलंदशहर येथे गोहत्याच्या अफवेवरुन हिंसाचार झाला होता. यावरुन ज्येष्ठ अभिनेते नसरूद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही या वादात उडी घेत शाह यांच्या वक्तव्याला मोहम्मद अली जिना यांच्या वक्तव्याशी जोडले होते.

Web Title: Mohammad Kaif Slams Pakistani Pm Imran Khan Over Minority Comment