३३ वर्ष नापास होणाऱया आजोबांना पावला कोरोना...

mohammad noorudin 51 year old man has cleared 10 examination after 33 yrs
mohammad noorudin 51 year old man has cleared 10 examination after 33 yrs

हैदराबाद: एक, दोन, तीन नव्हे तर तब्बल 33 वर्षे सलग नापास होणारे आजोबा यंदा दहावी पास झाले आहेत. कारण, सरकारने कोरोनाच्या संक्रमणामुळे सर्व विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचीही लॉटरी लागली. मोहम्मद नुरूद्दीन (वय 51) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

हैदराबाद येथील मोहम्मद नुरूद्दीन हे गेल्या ३३ वर्षांपासून लागोपाठ दहावीच्या परिक्षेत नापास होत आहेत. पण, त्यांनी कधीही हार मानली नाही. काही झाले तरी दहावीची परिक्षा पास व्हायचेच असा निर्धार त्यांनी केला होता. अखेर यावेळी त्यांना नशिबाने चांगलीच साथ दिली. राज्य सरकारने कोरोनाच्या संक्रमणामुळे सर्व विदयार्थांना पास करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद नुरुद्दीन सुद्धा याच नशिबवान विद्यार्थ्यांपैकी एक होते. तब्बल 33 वर्षांनी दहावीची परिक्षा पास झाल्यामुळे आनंद गगनात मावेनासे झाला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, '1987 पासून मी सलग परिक्षा देत आहे. पण, इंग्रजी विषय माझा कच्चा होता. त्यामुळे मी सतत नापास होत होतो. पण यावेळी मी पास झालो कारण सरकारने कोविड 19 च्या माहामारीमुळे सुट दिली आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com