शमी व त्याच्या पत्नीच्या फोटोवरून वादंग

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

हर किसी को जिंदगी मे मुकान नही मिलता. कुछ किस्मत वाले ही होते है जिन्हे ये नसीब होता है. जलते रहो. ये दोनो मेरी जिंदगी है. अच्छी तरह जानता हू क्या करना है और क्या नही. हमे अपने अंदर देखना चाहीए, हम कितना अच्छे है.

नवी दिल्ली - भारताचा क्रिकेटपटू महंमद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांचा फोटो सोशल मिडीयावरून व्हायरल होत असून, हसीनने परिधान केलेल्या कपड्यांवरून वाद निर्माण झाला आहे. मात्र, शमीनेही टीकाकारांना चोख उत्तर देत असेच जळत रहा असे म्हटले आहे.

शमीने पत्नी व मुलीसह ट्विटवरवर फोटो प्रसिद्ध केल्यानंतर हसीनच्या कपड्यांवर शंका उपस्थित करण्यात आल्या. हिजाबशिवाय हसीनचा फोटो असल्याने शमीला अनेक सल्ले देण्यात आले. तसेच त्याला इरफान पठाण याचाही दाखला देण्यात आला. अनेकांनी शमीला लाज नसल्याचीही आपत्तीजनक प्रतिक्रिया नोंदविल्या. मात्र, महंमद कैफने शमीला पाठिंबा देत शमीने पोस्ट केलेल्या फोटोंवर येत असलेल्या प्रतिक्रिया लाजीरवाण्या असल्याचे म्हटले आहे. देशात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. माझा शमीच्या कुटुंबीयांना पाठिंबा आहे.

शमीने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, ''हर किसी को जिंदगी मे मुकान नही मिलता. कुछ किस्मत वाले ही होते है जिन्हे ये नसीब होता है. जलते रहो. ये दोनो मेरी जिंदगी है. अच्छी तरह जानता हू क्या करना है और क्या नही. हमे अपने अंदर देखना चाहीए, हम कितना अच्छे है.''

Web Title: Mohammed Shami in the line of fire over wife’s dress in couple’s photo