हिजाबसंदर्भातील वादग्रस्त मुद्यावर काय म्हणाला मोहम्मद शमी?

Mohammed Shami
Mohammed ShamiSakal

भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) क्रिकेटसह राजकारण आणि सध्याच्या घडीला वादग्रस्त ठरत असलेल्या हिजाबच्या (Hijab Controversy ) मुद्यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. देशात शाळा आणि महाविद्यालयामध्ये कोणते कपडे घालावे? यासंदर्भात वाद सुरु आहे. यासंदर्भात एका मुलाखतीमध्ये त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मोहम्मद शमी म्हणाला की, मला कोणत्या वादग्रस्त मुद्यात पडायचे नाही. कपडे आणि संस्कृती या गोष्टीची प्रत्येक कुटुंबियाला जाणीव असते. देशातील संस्कृती विविधतेनं नटलेली आहे. पालकांनी मुलांना देशाच्या संस्कृतीच बद्दल माहिती द्यायला हवी. धार्मिकतेवर वाद निर्माण करण्यापासून लांब राहिले पाहिजे, असे मत त्याने मांडले. (mohammed shami on up politics army and hijab controversy)

Mohammed Shami
प्लॅन B नाहीये...! अनसोल्ड रैनाचा व्हिडिओ होतोय व्हायरल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही तुझे कौतुक केले आहे. यासंदर्भात भावना कशा व्यक्त करशील, असा प्रश्नही त्याला विचारण्यात आला होता. यावर शमी म्हणाला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी टीम इंडियाबद्दल काहीतरी बोलतात तो क्षण अभिमानास्पद असतो. तुम्ही आम्ही आणि सर्वांनी त्यांना निवडून दिले आहे. जेव्हा त्याचे तुमच्यावर लक्ष असते त्यावेळी खूप चांगले वाटते, असेही मोहम्मद शमीने सांगितले.

Mohammed Shami
KL राहुलची लाख मोलाची मदत; वरदच्या आईनं जोडले हात; म्हणाली...

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर लष्करी गणवेश परिधान करायला आवडेल का? असा प्रश्नही टाइम्स नाऊच्या मुलाखतीमध्ये त्याला करण्यात आला होता. यावरही त्याने अभिमनास्पद उत्तर दिले. भारतीय जवानांचे कौतुक करताना मोहम्मद शमी म्हणाला की, आपले जवान मायनस डिग्रीमध्ये कार्यरत असतात. ते बर्फात उभे आहेत म्हणून आपण शांत झोपू शकतो. जर भारतीय लष्करासोबत काम करायची संधी मिळाली तर निश्चितच आवडेल, असे उत्तर त्याने दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com