काम करतात म्हणून मोदी पंतप्रधान: मोहन भागवत

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 13 जुलै 2017

नवी दिल्ली - नरेंद्र मोदी काम करतात म्हणून ते पंतप्रधान झाले. उद्या ज्याला काम करायचे असेल तो पंतप्रधान झाला नाही तर काय कराल, असा प्रश्‍न सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज देशवासीयांसमोर ठेवला. नेत्यांच्या चरित्राकडे "बिटविन द लाइन्स' पाहावे असे सांगतानाच, "मोदी व शहा यांनी 2024 पर्यंत सत्तेचा "सुरक्षित अंदाज' मनाशी निश्‍चित गृहीत धरलेला असावा,' अशीही पुस्ती त्यांनी जोडली.

देशवासीयांच्या आशेचे किरण बनलेले पंतप्रधान मोदी समर्पण वृत्तीने व देशभक्तीच्या भावनेतून काम करत आहेत. त्यांनी कोणतेही आव्हान अशक्‍य मानले नाही, अशी स्तुतिसुमनेही भागवत यांनी उधळली. कोणत्याही समाजाला त्याची सुख-दु:खे समजून घेणाऱ्या व त्याच्या कल्याणाची व्यवस्था करू शकणाऱ्या एका ठेकेदाराची गरज असते. मोदी यांच्या रूपाने आपल्या समाजाला तो ठेकेदार मिळाला म्हणून इतर सर्वांनी झोपून राहता कामा नये, सारी कामे सरकारच करेल असे समजू नये, असेही ते म्हणाले.

"सुलभ इंटरनॅशनल'चे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी मोदींच्या जीवनावर लिहिलेल्या "द मेकिंग ऑफ अ लिजंड' या पुस्तकाचे प्रकाशन आज भागवत यांच्या हस्ते मावळंकर सभागृहात झाले. भाजपचे अध्यक्ष अमित शहा, पुद्दुचेरीच्या राज्यपाल किरण बेदी, राष्ट्रीय पुस्तक मंडळाचे प्रमुख बलदेव शर्मा, तसेच व्ही. के. सिंह, महेंद्र पांडे, अर्जुनराम मेघवाल आदी राज्यमंत्री उपस्थित होते.

भागवत म्हणाले, की मोदी आजही स्वयंसेवकाचेच जीवन जगतात. स्वयंसेवकापासून ते मुख्यमंत्री व पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रकाशझोतातला व जगासाठी चर्चेचा विषय झाला आहे. स्वयंसेवक असलेल्या मोदींचे जीवन तेवढे प्रकाशात आलेले नाही, तरी त्यांच्या आजच्या वलयाचा पाया तोच आहे. मोदींचे व्यक्तित्व, कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे मोदी जगन्मान्यता पावले.

शहा यांचे टीकास्त्र
"जॉबलेस ग्रोथ'ची टीका करणाऱ्यांवर शहा यांनी टीका केली. उधारीवर आणलेल्या योजना व मॉडेल्स यावर भारताचा विकास होणे शक्‍य नाही असे सांगतानाच, त्यांनी पुस्तकात मोदींना "लिजंड' ही उपाधी दिल्याबद्दल जाहीरपणे नापसंती व्यक्त केली. तीन वर्षांत एकही दिवस सुटी न घेणारे मोदी हे 70 वर्षांतील पहिले पंतप्रधान आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: mohan bhagwat marathi news sakal news new delhi news narendra modi