मोहेंजोदडोमधील नृत्यांगनेची मूर्ती देवी पार्वतीची?

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

वाराणसी - मोहेंजोदडोच्या अवशेषांमधील प्रसिद्ध (डासिंग गर्ल) नृत्यांगनेची कांस्य मूर्ती ही देवी पार्वतीची असल्याचा दावा वाराणसी हिंदू विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक ठाकुर प्रसाद वर्मा यांनी केला आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्राध्यापक वर्मा यांनी 'वैदिक सभ्यता के पुरातत्व' विषयाचा शोध निबंध सादर केला असून, त्यात सिंधू प्रदेशातील संस्कृतीबद्दल माहिती आहे. सिंधू संस्कृती 2500 इ. पू. काळातील असून, ती शिव उपासक असल्याचा उल्लेख यात आहे. 

मोहेंजोदडो म्हणजे मृतांचा डोंगर, हे पाकिस्तानातील सिंध प्रांतातील गाव आहे. येथे पुरातत्त्वीय उत्खननात अनेक धातूंच्या मूर्ती, नाणी, भांडी अशा वस्तू आढळल्या होत्या.
 
Web Title: Mohenjo-daro's 'Dancing Girl' is Hindu goddess Parvati, claims paper in ICHR journal