'मोमो'चा भारतात पहिला बळी 

वृत्तसंस्था
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

जयपूर (वृत्तसंस्था) : 'ब्लू व्हेल' या ऑनलाइन गेमच्या नादात भारतासह जगभरात अनेक लहान मुलांचा जीव गेल्यानंतर आता "मोमो' हा तशाच प्रकारचा गेम खेळण्याचे प्रकार घडत आहेत. भारतात जयपूरमध्ये दहावीतील एका मुलीने घरात गळफास लावून आत्महत्या केली असून, या ऑनलाइन खेळामुळेच तिने हे कृत्य केल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी ही "मोमो' गेमच्या अखेरच्या टप्प्यात पोचली होती आणि त्यामुळे तिला अत्यानंद झाला होता. ब्लू व्हेल'प्रमाणेच या गेममध्येही विविध आव्हाने देऊन ती पूर्ण करण्यासाठी दबाव आणला जातो. ही मुलगी मोकळा वेळ मिळताच मोबाईल हातात घेऊन खेळात गुंग होत होती, असे तिच्या भावाने सांगितले. आज तिने हाताची नस कापून घेत नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या खोलीत चिठ्ठीही आढळून आली असून, यात परीक्षेत कमी गुण पडल्याने आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. मात्र, ऑनलाइन गेममुळेच तिने हे कृत्य केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. 

Web Title: Momo's first victim in India