ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याने सत्येंद्र जैन रुग्णालयात दाखल

Money laundering case Satyendra Jain hospitalized Oxygen levels decreased
Money laundering case Satyendra Jain hospitalized Oxygen levels decreasedMoney laundering case Satyendra Jain hospitalized Oxygen levels decreased

नवी दिल्ली : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन (५७) यांना सोमवारी (ता. २०) लोकनायक जय प्रकाश रुग्णालयात दाखल (hospitalized) करण्यात आले. जैन (Satyendra Jain) यांना ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याच्या तक्रारीनंतर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले. (Money laundering case Satyendra Jain hospitalized Oxygen levels decreased)

मिळालेल्या माहितीनुसार, पाठदुखी आणि हृदयाचे ठोके वाढल्याने जैन यांना प्रथम तिहार तुरुंगातून जीबी पंत येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर लोकनायक जय प्रकाश रुग्णालयात दाखल (hospitalized) करण्यात आले. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जैन यांना ३० मे रोजी अटक केली. जैन सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. एप्रिलमध्ये ईडीने जैन कुटुंबाशी संबंधित कंपन्यांची ४.८१ कोटींची मालमत्ता जप्त केली होती.

Money laundering case Satyendra Jain hospitalized Oxygen levels decreased
अग्निपथ वाद : योजनेचे नाव न घेता PM मोदींनी दिला संदेश; म्हणाले...

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money laundering ) ईडीने गेल्या महिन्यात अटक केलेले सत्येंद्र जैन यांचा जामीन अर्ज शनिवारी विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला होता. स्लिप ॲप्नियाचा त्रास होत असल्याचे सांगत जैन यांनी जामीन मागितला होता. जैन यांची वैद्यकीय स्थिती दर्शविणारी कागदपत्रे नसताना केवळ स्लिप ॲप्नियाचा त्रास असल्याच्या आधारावर जामिनावर सोडता येणार नाही, असे विशेष न्यायाधीश गीतांजली यांनी सांगितले होते.

पुराव्यावर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही

प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे. आरोपी प्रभावशाली स्थितीत असल्याने पुराव्यावर प्रभाव पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रकरणातील वस्तुस्थिती, परिस्थिती आणि आरोपींवरील आरोपांचे स्वरूप लक्षात घेऊन जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. जैन (Satyendra Jain) यांना स्लिप ॲप्नियाचा त्रास होता. जो अत्यंत गंभीर होता, असे जैन यांच्या वकिलाचे म्हणणेही न्यायालयाने फेटाळले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com