संतापजनक! माकडाला झाडाला टांगून देण्यात आली फाशी

पीटीआय
Monday, 29 June 2020

केरळमध्ये गर्भवती हत्तिणीला फटाक्‍यांनी भरलेले अननस खायला देऊन तिची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यानंतर आता माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना तेलंगणात घडली आहे.

हैदराबाद-  केरळमध्ये गर्भवती हत्तिणीला फटाक्‍यांनी भरलेले अननस खायला देऊन तिची हत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. त्यानंतर आता माणुसकीला काळिमा फासणारी दुसरी घटना तेलंगणात घडली आहे. शेतीचे नुकसान केले म्हणून येथे माकडाला क्रूरतेने फाशी देण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. 

धक्कादायक : चिनी कंपन्यांकडून, पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी!
तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील अम्मापालेम गावात एका शेतात माकडांचा कळप धुमाकूळ घालत होता, त्यामुळे शेतकरी हैराण झाले होते. त्यामुळे शेतकरी पहारा देत होते. त्यातील एका शेतकऱ्याने शेत राखण्यासाठी सादू वेंकटेश्‍वर राव याला ठेवले होते. राव व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी तेथे आलेल्या माकडांच्या कळपावर हल्ला चढविला. लाकडी दंडुक्‍याने तीन माकडांना मारत जखमी केले. त्यातील दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झाले; मात्र एक जण पळून जाताना पाण्याच्या टाकीत पडला. मात्र, माणुसकीहीन असलेल्या राव व त्याच्या साथीदारांनी त्याला तेथेही मारहाण केली. तसेच, त्याला लगतच्या झाडाला फाशी देण्याची क्रूरताही त्यांनी केली. या निर्घृण हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी राव याच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. झाडाला लटकवलेल्या माकडावर कुत्र्यांकडूनही हल्ला करण्यात आला होता. 

गूगलवर आणखी एक आरोप

इतर माकडांना धडा शिकवण्यासाठी फाशी 

पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपी सादू वेंकटेश्‍वर राव याने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले, की माकडाचा मृत्यू झाला असे वाटल्याने त्याला झाडाला लटकवण्यात आले. त्याला बघून बाकीचे माकड घाबरून पुन्हा शेतात येणार नाहीत, अशी आमची समजूत होती म्हणून आम्ही त्याला झाडाला लटकवले. मात्र, त्यानंतर आमच्या लक्षात आले की ते जिवंत होते, अशी कबुली राव याने दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The monkey was hanged in telangana