स्कायमेटचा अंदाज; यंदा सरासरी 93 टक्के पाऊस

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

एप्रिल महिन्यातीलच कडक उन्हाळा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे चिंता असताना स्कायमेटने आज (बुधवार) यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तविला

नवी दिल्ली : एप्रिल महिन्यातीलच कडक उन्हाळा आणि दुष्काळी परिस्थितीमुळे चिंता असताना स्कायमेटने आज (बुधवार) यंदाच्या पावसाचा अंदाज वर्तविला असून, सरासरी 93 टक्के पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

स्कायमेटने व्यक्त केलेल्या या अंदाजात पावसाच्या सरासरीत 5 टक्क्यांची कमी किंवा वाढ होण्याची शक्यता आहे. स्कायमेटने नोंदवलेल्या या अंदाजात जूनपासून ते सप्टेंबर या चार महिन्यांतील पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यानुसार यंदा सरासरी 93 टक्के पावसाचा अंदाज आहे. 

जून महिन्यात 77 टक्के, जुलैमध्ये 91 टक्के, ऑगस्टमध्ये 102 टक्के आणि सप्टेंबरमध्ये 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ऑगस्टमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. तर इतर तीन महिन्यांतील पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल. 'अल निनो' वादळाचा यंदाच्या पावसाळ्यावर परिणाम होईल, असा अंदाज यापूर्वीच वर्तविण्यात आलेला आहे.

Web Title: Monsoon 2019 to be below normal at 93 percent estimate by Skymet