मॉन्सून आला रेss! केरळमध्ये दाखल

Monsoon
Monsoon

पुणे : बहुप्रतीक्षेत असलेला मॉन्सून (नैर्ऋत्य मोसमी वारे) देशाच्या उंबरठ्यावर दाखल झाला आहे. आज (शनिवार) केरळच्या किनाऱ्यावर त्याची दमदार हजेरी लागल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली.

मॉन्सूनने बुधवारी श्रीलंकेचा बहुतांश भाग व्यापला होता. त्यानंतर मॉन्सूनमध्ये फारशी प्रगती झालेली नाही. अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तो स्थिरावला आहे. याच्या पुढच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण अरबी समुद्रात निर्माण झाले आहे. त्यामुळे देशाच्या उंबरठ्यावर पोचलेला मॉन्सून केरळ किनारपट्टीवर बरसेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. अखेर आज केरळच्या किनारपट्टीवर मॉन्सून दाखल झाला आहे.

मॉन्सूनने श्रीलंकेतील कोलंबोच्या उत्तरेकडील कातूनायके शहरापर्यंत टप्पा ओलांडून जवळपास निम्मा श्रीलंका देश व्यापला आहे. तर अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात वाऱ्यांनी प्रगती केली आहे. विषुववृत्ताकडून येत असलेले वाऱ्यांचे प्रवाह, दक्षिण भागात हवेचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र सक्रिय असून, महाराष्ट्र आणि केरळच्या किनाऱ्याला समांतर हवेच्या कमीदाबाचा पट्टा तयार झाला आहे. मॉन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हे पोषक वातावरण आहे.

दरम्यान, अरबी समुद्रात केरळ-कर्नाटक किनारपट्टीलगत हवेचे कमी दाब क्षेत्र तयार होत आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र किनाऱ्यालगत उत्तरेकडे सरकत जाणार आहे. मॉन्सून केरळात दाखल झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या या क्षेत्राच्या वाटचालीवर मॉन्सूनची प्रगती ठरणार आहे. बंगालच्या उपसागरावरील मॉन्सूनची प्रगती शक्‍य असून, शनिवारपर्यंत ईशान्य भारतातील काही राज्यात मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज आहे.

यंदा मॉन्सूनची वाटचाल अडखळतच सुरू आहे. अंदमानात 18 मे रोजी पोचलेल्या मॉन्सूनने तब्बल आठवडाभरानंतरही फारशी प्रगती केलेली नव्हती. त्यामुळे मॉन्सूनचे केरळातील आगमनही या वर्षी लांबले आहे. मॉन्सून 6 जूनला केरळामध्ये बरसेल, अशी शक्‍यता वर्तविण्यात आला होता. मात्र आज 8 जूनला मॉन्सून केरळात दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com