चक्रीवादळात अडलेल्या 27 जणांना नौदलाने वाचविले

पीटीआय
गुरुवार, 1 जून 2017

नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या बंगालच्या उपसागरात असलेल्या बोटीने दक्षिण चटगावपासून 100 मैलांवर अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका केली. वाचविण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे, असे शर्मा यांनी सांगितले. खराब हवामानामुळे बचाव आणि शोधकार्यात अडथळे येत आहेत.

नवी दिल्ली : मोरा या चक्रीवादळात अडकलेल्या 27 बांगलादेशी नागरिकांची सुटका आज भारतीय नौदलाने केली. या वादळामुळे अनेक नागरिकांना मोठा तडाखा बसला असून, अनेक जण बेघर झाले आहेत.

भारतीय नौदलाची नौका सुमित्राने 27 जणांची सुटका केली. बांगलादेशच्या चितगावपासून 100 मैलांवर हे नागरिक अडकले होते, अशी माहिती नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले. बांगलादेशमधील या कामात नौदलाच्या पूर्व कमांडच्या पी-81 या विमानाने यात मदत केली. नौदलाच्या आयएनएस सुमित्रा या बंगालच्या उपसागरात असलेल्या बोटीने दक्षिण चटगावपासून 100 मैलांवर अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका केली. वाचविण्यात आलेल्या नागरिकांमध्ये महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश आहे, असे शर्मा यांनी सांगितले. खराब हवामानामुळे बचाव आणि शोधकार्यात अडथळे येत आहेत.

बांगलादेशात मोर वादळामुळे काल भुस्खलन झाल्याने सहा जण मरण पावले तर अनेक घरांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी किनारपट्टीजवळील 50 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. वादळामुळे चितगाव आणि कॉक्‍स बझार विमानतळावरील सर्व विमानसेवा बंद करण्यात आली होती.

Web Title: mora wind 27 saved by indian navy