36 लाख महिला शेतकऱ्यांना सरकार देतंय आधार, पाहा कसा

वृत्तसंस्था
सोमवार, 9 डिसेंबर 2019

या योजनेचा सर्वाधिक फायदा मध्यप्रदेशमधील महिलांना झाला आहे. मध्यप्रदेशातील महिलांना 6.46 लाख रुपयांच्या योजनांचा लाभ झाला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील महिलांना 5.18 लाख रुपये आणि त्यानंतर ओडिशातील महिलांना 4.61 लाख रुपयांच्या योजनांचा लाभ झाला आहे. 

नवी दिल्ली : देशातील तब्बल 36 लाखांहून जास्त महिलांना सरकारच्या योजनांचा लाभ शेतीच्या कमांत लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने शेतीची कामं करणाऱ्या महिलांसाठी 84 प्रकल्पांमध्ये 847 करोड रुपयांची तरतूद केली आहे. या निधीचा देशातील 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील महिलांना लाभ मिळाला आहे, अशी माहिती कृषी खात्याने संसदेत दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

सरकार महिला शेतकरऱ्यासाठी कोणत्या योजना राबविते की नाही या प्रश्नावर कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लेखी स्वरुपात उत्तर दिले. ग्रामविकास मंत्रालयतर्फे महिला किसान सशक्तीकरण परियोजना (MKSP) राबविण्यात येत आहे ज्यात गुंतवणूक करन महिलांचा शेतीतील सहभाग वाढविण्यात येत आहे. 

या योजनेअंतर्गत 84 प्रकल्प राबविण्यात येत आहेत ज्यातून 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 36.06 लाख महिलांना लाभ मिळाला आहे. यातील 1.81 लाख महिला या महाराष्ट्रातील आहेत. 

अमृता फडणवीस शिवसेनेवर भडकल्या; 'शिवसेना कमिशन खोर'

MKSPच्या संकेतस्थळानुसार या योजनेचा सर्वाधिक फायदा मध्यप्रदेशमधील महिलांना झाला आहे. मध्यप्रदेशातील महिलांना 6.46 लाख रुपयांच्या योजनांचा लाभ झाला आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातील महिलांना 5.18 लाख रुपये आणि त्यानंतर ओडिशातील महिलांना 4.61 लाख रुपयांच्या योजनांचा लाभ झाला आहे. 

MKSP हा नॅशनस रुरल लाईव्हलीहूड मिशनचा एक भाग आहे. या मिशनअंतर्गत महिलांचे शेतीतील स्थान बळकट करण्यावर काम केले जाते    


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 36 lakh women farmers have been benefited from government scheme