कर्नाटकमध्ये 900 सिलिंडरचा स्फोट

वृत्तसंस्था
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सिलिंडरच्या स्फोटामुळे रात्री संपूर्ण परिसर हादरला. गावाजवळच्या परिसरात एलपीजीचा वास पसरला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला बऱ्याच वेळानंतर यश आले.

बंगळुरु - कर्नाटकमधील चिक्काबलापुरा जिल्ह्यातील चिंतामणी गावाजवळ रविवारी रात्री दोन ट्रकमधील तब्बल 900 सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात जिवीतहानी झाल्याचे वृत्त नाही.

या दुर्घटनेत दोन ट्रक जळून खाक झाले असून, एक बोलेरो गाडीही जळाली. सुरुवातीला सिलेंडर असलेल्या एका ट्रकला आग लागली. त्यानंतर दुसऱ्या ट्रकमध्येही पसरली. ट्रकच्या बॅटरीतील शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

सिलिंडरच्या स्फोटामुळे रात्री संपूर्ण परिसर हादरला. गावाजवळच्या परिसरात एलपीजीचा वास पसरला होता. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला बऱ्याच वेळानंतर यश आले.

Web Title: More than 900 cylinders blast near Chintamani, Karnataka

टॅग्स