दहशतवादी हल्ल्यांपेक्षा खड्ड्यांमुळे अधिक मृत्यू : सर्वोच्च न्यायालय

पीटीआय
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन त्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या कदाचित दहशतवादी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांपेक्षा अधिक असेल, अशी नाराजी सर्वोच्च न्यायालयाने आज व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांत रस्ते अपघातात 14,926 नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल न्यायालयाने आज चिंता व्यक्त केली आणि असे प्रकार "अमान्य' असल्याचे स्पष्ट केले. 

भारतात खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने अहवाल सादर केला असून, न्या. मदन बी. लोकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे तो आज चर्चेसाठी आला, या वेळी न्यायालयाने सरकारला जाब विचारला. 2013 ते 2017 या काळात खड्ड्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या पाहता संबंधित विभाग रस्त्यांची योग्य प्रकारे निगराणी राखत नसल्याचे स्पष्ट होत आहे, असे सांगत न्यायालयाने केंद्र सरकारला या अहवालावर प्रतिसाद देण्याचे आदेश दिले.

"रस्ते अपघातांबाबतची परिस्थिती धक्कादायक असून, खड्ड्यांमुळे अपघात होऊन मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबीय नुकसानभरपाई मिळण्यास पात्र असू शकतात,' असे महत्त्वपूर्ण मतही न्यायालयाने आज व्यक्त केले. इतक्‍या मोठ्या संख्येने अपघातांमध्ये नागरिकांचा बळी जात असताना रस्त्यांची निगराणी राखण्याची जबाबदारी असणारे सरकारी अधिकारी आपले कर्तव्य नीट बजावत नसल्याचे दिसून येत आहे, असेही न्यायालयाने फटकारले. 

Web Title: More deaths due to pits than terror attacks says Supreme Court