दिलासादायक! मागील 24 तासांत 1 लाखांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 23 September 2020

मागील 3 दिवसांपासून देशात 90 लाखांहून जास्त कोरोना रुग्ण बरे झाले होते. आता अजून एक कोरोनाबद्दल दिलासादायक बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली: मागील 3 दिवसांपासून देशात 90 लाखांहून जास्त कोरोना रुग्ण बरे झाले होते. आता अजून एक कोरोनाबद्दल दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात पहिल्यांदाच एका दिवसात 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दुसऱ्याबाजूला महाराष्ट्रातही 20 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2 लाख 72 हजार कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. 

मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 83 हजार 347 नवीन रुग्ण आढळले असून 1,085 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या 56 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासांतील कोरोना रुग्णांची वाढ धरुन आतापर्यंत देशात 56 लाख 46 हजार 11 जणांना कोरोना झाला आहे. याघडीला देशात 9 लाख 68 हजार 377 कोरोनाचे रुग्ण उपचार घेत आहेत. 

दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 45 लाख 87 हजार  614 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच कोरोना रुग्णांचा मृत्यूचा आकडा 90 हजारांच्या वर गेला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ( Ministry of Health & Family Welfare) दिली आहे.

 रिया, मुंबई पोलिस आणि BMC ला टार्गेट करणाऱ्या DGP गुप्तेश्वर पांडेय यांची स्वेच्छानिवृत्ती; राजकारणात उतरणार?

 

 

बुधवारी एका दिवसात कोरोनाच्या 9 लाख 53 हजार 683 चाचण्या झाल्या असून आतापर्यंत देशात 6 कोटी 72 लाख 79 हजार 462 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 
भारतात कोरोनाच्या चाचण्या वाढल्यामुळे अनेक राज्यात तसेच केंद्रशासित प्रदेशात कोरोना रुग्णांचा दर राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने (Indian Council of Medical Research) दिली आहे.

 'व्हॉईसरॉय मोदी' म्हणत सोनिया गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 18 हजार 390 कोरोना रुग्णांचं निदान झालं आहे. तर 392 कोरोना रुग्ण दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत 12 लाख 42 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात आतापर्यंत 33 हजार 407 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
 

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than one lakh corona free in last twenty four hours