Gujarat : PM मोदींच्या गुजरातमध्ये सव्वा लाखांहून अधिक बालके कुपोषित; सरकारनेच दिली माहिती

Narendra Modi
Narendra Modi

अहमदाबाद - गुजरातमध्ये सव्वा लाखांहून अधिक मुले कुपोषित असून परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत, अशी माहिती गुजरात सरकारने गुरुवारी विधानसभेत दिली. तर २४,१२१ जण 'अत्यंत कमी वजनाच्या' श्रेणीत मोडतात.सभागृहात प्रश्नोत्तराच्या काळात काँग्रेस आमदाराने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

Narendra Modi
Viral Video : फायनान्सवाल्यांनी हद्दच केली! हप्ते थकविणाऱ्याची गाडी दुचाकीवरूनच उचलून नेली

यावर महिला आणि बाल विकासमंत्री भानुबेन बाबरिया यांनी म्हटलं की, राज्यात एक लाख २५ हजार ७०७ बालके कुपोषित आहे. यापैकी १ लाख १ हजार ५८६ बालके कमी वजनाच्या गटात आहेत. तर २४ हजार बालकांचे वजन फारच कमी आहे.

बाबरिया यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, आदिवासीबहुल नर्मदा जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक (१२,४९२), त्याखालोखाल वडोदरा (११,३२२), आनंद (९,६१५), साबरकांठा (७,२७०) आणि भरूच (५,८६३) यांचा क्रमांक लागतो.

Narendra Modi
Aniksha Jaisinghani : अमृता फडणवीसांना धमकावणारी अनिक्षा जयसिंघानी कोण? जाणून घ्या...

बाबरिया म्हणाल्या की, अंगणवाड्यांमध्ये (बालसंगोपन केंद्र) तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना गरम नाश्ता आणि दुपारचे जेवण दिले जाते. याशिवाय मुलांना आठवड्यातून दोनदा फळे दिली जातात. कुपोषण दूर करण्यासाठी सरकार सर्वोतपरी प्रयत्न करत असल्याचं त्यांनी म्हटलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com