esakal | Corona: सलग चौथा दिवस 3 लाखांहून अधिक रुग्णांचा; अडीच हजारांच्या वर मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona: सलग चौथा दिवस 3 लाखांहून अधिक रुग्णांचा; अडीच हजारांच्या वर मृत्यू
Corona: सलग चौथा दिवस 3 लाखांहून अधिक रुग्णांचा; अडीच हजारांच्या वर मृत्यू
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या कहराने डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर अभूतपूर्व असा ताण निर्माण झाला आहे. देशात ऑक्जिनची कमतरता भासत असून अनेक रुग्णांना त्याअभावी प्राण देखील गमवावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात तीन लाखांच्या पार दैंनदिन रुग्णसंख्या आढळत आहे. काल शुक्रवारी देखील देशात सुमारे साडेतीन लाख नवे रुग्ण आढळले आहेत तर तब्बल अडीच हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात काल 66,836 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 41,61,676 वर पोहोचली आहे. राज्यात काल 74,045 रुग्ण बरे झाले आहेत. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह राज्यातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 34,04,792 वर पोहोचली आहे. राज्यात काल 773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह राज्यातील एकूण मृतांची संख्या 63,252 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात एकूण 6,91,851 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत.