पंतप्रधानांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री नेमके कोण ?

वृत्तसंस्था
सोमवार, 18 जून 2018

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री नेमके कोण आहेत, हा प्रश्न सध्या पडला आहे. त्याचबरोबर, काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनीही मोदी यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री नेमके कोण आहेत, हे सांगावे असे म्हटले आहे. कारण की, पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर वेगळेच नाव आणि अर्थमंत्रालयाच्या संकेतस्थळावर वेगळेच नाव आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री नेमके कोण आहेत, हा प्रश्न सध्या पडला आहे. त्याचबरोबर, काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनीही मोदी यांनी त्यांच्या मंत्रीमंडळातील अर्थमंत्री नेमके कोण आहेत, हे सांगावे असे म्हटले आहे. कारण की, पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर वेगळेच नाव आणि अर्थमंत्रालयाच्या संकेतस्थळावर वेगळेच नाव आहे. त्यामुळे नेमके अर्थमंत्री कोण आहेत हे समजत नाही. अर्थिक विकासाच्या दृष्टीने संपर्क साधण्यासाठी हे कठीण आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, अरुण जेटली यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली असून, उपचार चालू असल्याने 14 मे पासून पियूष गोयल यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. परंतु, पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर वेगळी आणि अर्थमंत्रालयाच्या संकेतस्थळावर वेगळी माहीती असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. 

Web Title: More Will PM Modi clarify who is the Finance Minister today says congress