एटीएममधून बाहेर आल्या गांधीजींचे चित्र नसलेल्या नोटा

वृत्तसंस्था
रविवार, 30 एप्रिल 2017

येथील स्टेट बँक इंडियाच्या एका एटीएममधून बाहेर आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र नसल्याची बाब समोर आली आहे.

मोरेना (मध्य प्रदेश) : येथील स्टेट बँक इंडियाच्या एका एटीएममधून बाहेर आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र नसल्याची बाब समोर आली आहे.

मोरेना येथील निवासी गोवर्धन शर्मा शुक्रवारी रात्री नल्ला नंबर दोन परिसरातील एसबीआयच्या एटीएममध्ये पैसे काढण्यास गेले. त्यावेळी एटीएममधून बाहेर आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र नसल्याचे आढळले. ही बाब त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आणून दिली. नंतर त्यांनी एटीएममध्ये असलेल्या मदत कक्षाच्या क्रमांकावर फोन केला. या प्रकरणावर फक्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच तोडगा शोधू शकते असे सांगून शर्मा यांना नोटा बदलण्यासाठी प्रतिक्षा करण्यास सांगण्यात आले. या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास बॅंकेचे अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाही.

अलिकडेच 23 एप्रिल रोजी मध्य प्रदेशमधील शोपुरा येथेही असाच प्रकार समोर आला होता. एका शेतकऱ्याने एसबीआयच्या एटीएममधून चाळीस हजार रुपये काढल्यानंतर त्यातील दोन हजारांच्या काही नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र नव्हते.

Web Title: Morena ATM’s Rs 500 notes ‘dump’ Mahatma Gandhi’s image