उद्या मध्यरात्रीपासून ‘लॉकडाउन’? ते सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र, ठळक बातम्या क्लिकवर

morming.jpg
morming.jpg

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक झाली आहे. सरकारने ही साथ आटोक्यात आणण्यासाठी विविध प्रयत्न सुरु केले आहेत. त्याच अनुषंगाने गेल्या आठवडाभरापासून राज्यात लॉकडाऊन लागू करण्याबाबत सरकारने सामाजिक, राजकीय, औद्योगिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वांशी चर्चा-विमर्श केला. त्यामुळे राज्यात उद्या म्हणजे १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले असून त्यात त्यांनी तीन महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले आहे. तर बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि भाजपचे उमेदवार राहुल सिंघा यांनी वादग्रस्त विधाने केली असून त्यांच्यावर निवडणूक आयोग कारवाई का करीत नाही, असा सवाल इतर पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर. 


नवी दिल्ली - देशभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या (Corona virus) संख्येत भर पडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना एक पत्र लिहले आहे. याद्वारे त्यांनी तीन प्रमुख मुद्द्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. वयापेक्षा आवश्यकतेनुसार लसीकरण करावे, ज्या भागात संसर्ग वाढू लागला आहे, तिथे लस उपलब्ध करुन द्याव्यात आणि आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक त्या लसी वापरण्यास परवानगी द्यावी, असे गांधींनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. वाचा सविस्तर


मुंबई - राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्याची सरकारची पूर्ण तयारी झाली असून, १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी होईल, अशी खात्रीलायक माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली आहे. हे लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत असेल. सार्वजनिक वाहतुकीवर पूर्णतः बंदी घातली जाणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यावर कठोर निर्बंध राहणार असून केवळ अत्यावश्यक प्रवासाचीच मुभा राहील, असे सांगण्यात येते. वाचा सविस्तर

हेही वाचा- धक्कादायक प्रकार! बेड न मिळाल्याने रुग्णावर कारमध्ये उपचार; रुग्णांसह नातेवाईकही हतबल

कोलकता - प्रचारावर बंदी घातल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी या कोलकत्यामधील गांधी पुतळ्याजवळ धरणे धरणार आहेत. डावे नेते सुजन चक्रवर्ती यांनी बॅनर्जी यांच्या कारवाईबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. बंगालमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि भाजपचे उमेदवार राहुल सिंघा यांनी वादग्रस्त विधाने केली असून त्यांच्यावर आयोग कारवाई का करीत नाही, असा सवाल इतर पक्षांच्या नेत्यांनी केला. वाचा सविस्तर

नागपूर - तब्बल १०२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी १३ एप्रिल १९१९ ला अमृतसर शहरात हजारो लोकांची गर्दी जमली होती. निमित्त होतं बैसाखी सणाचं. याच काळात रौलेट कायद्याचा निषेध करणाऱ्या सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक केली होती, तर आंदोलकांवर गोळ्याही चालवण्यात आल्या होत्या. त्यामुळे सर्व जनता पेटून उठली होती. सरकारचा निषेध करण्यासाठी बैसाखीनिमित्त शहरात आलेले हजारो लोक जालियनवाला बागेत विश्रांती करत वक्त्यांची भाषणे ऐकत होती. पण, वाचा सविस्तर


मुंबई - गुढीपाडव्यावर गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही कोरोनाच्या साथीचे सावट आहे. महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून उच्चांकी संख्येने कोरोनारुग्णांची नोंद होत आहे. यामुळेच गुढीपाडव्याचा सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालयाने केले आहे. यासाठी सोमवारी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. वाचा सविस्तर


मुंबई - वानखेडेच्या मैदानात अखेरच्या चेंडूपर्यंत रंगतदार झालेल्या 200 पारच्या लढाईत अखेर पंजाबाने बाजी मारली. धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने विक्रमी शतक केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी 5 धावा हव्या असताना अर्शदीपच्या गोलंदाजीवर संजू झेलबाद झाला. त्याने 63 चेंडूत 119 धावांची खेळी केली. यात 12 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता. 222 धावांचे टार्गेट चेस करताना राजस्थानचा संघ निर्धारित 20 षटकात 7 बाद 217 धावांपर्यंत मजल मारु शकला. वाचा सविस्तर

हेही वाचा- कुंभ मेळ्यात कोरोना प्रोटोकॉल पायदळी; 102 जणांना लागण

औरंगाबाद - तेरा महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या छायेत आपण जगत आलो आहोत. जगताना भोवताली अनेक बदल दिसले. तेरा महिने संसर्ग म्हणजे मोठा काळ यापुढेही काही काळ कोरोनासोबतच राहावे लागण्याची शक्यता आहे. मार्च २०२० मध्ये औरंगाबादेत पहिला कोरोनाबाधित आढळला व त्यानंतर आज हीच संख्या तब्बल एक लाख १८४ जण आतापर्यंत कोरोनाबाधित आढळली. वाचा सविस्तर



मुंबई - राज्यात रेमेडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने औषध कंपन्यांकडून हे इंजेक्शन खरेदी करून ते महाराष्ट्रातील रुग्णांना पुरविण्यासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दमणच्या औषध कंपनीस भेट दिली. त्यानंतर त्यांनी पक्षातर्फे 50 हजार रेमेडिसीवीर इंजेक्शन राज्याला देण्याचे जाहीर केले. वाचा सविस्तर



सातारा - Indian Air Force Recruitment 2021 : भारतीय हवाई दलात नोकरी मिळवणे हे बर्‍याच लोकांचे स्वप्न असते. याच्याकडे एक आकर्षक नोकरी क्षेत्र म्हणून देखील पाहिले जाते. जर तुम्हालाही भारतीय हवाई दलात जायचे असेल, तर तुम्ही नुकत्याच जाहीर झालेल्या भरतीसाठी अर्ज करू शकता. यात गट सी'मध्ये स्टेनो, अधीक्षक, कुक, घरगुती कर्मचारी, मल्टी टास्किंग स्टाफ अशा विविध पदांसाठी भरती केली जाणार असून ग्रुप सीसाठी एकूण 1,524 रिक्त पदे असल्याचे Air Force ने जाहीर केले आहे. वाचा सविस्तर


नाशिक - 2 एप्रिलपासून नाशिक शहरात सोमवार ते शुक्रवार अंशत: लॉकडाउन, तर शनिवार व रविवार असे दोन दिवस संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. परंतु वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महिनाभर संपूर्ण लॉकडाउन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. शासनाकडून येत्या एक-दोन दिवसांत लॉकडाउन जाहीर होईल, या चर्चेने किमान महिनाभराचा किराणा मालाचा साठा भरून ठेवण्यासाठी दुकानांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वाचा सविस्तर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com