राज्यात अवकाळी पावसाचे सावट ते पुण्यात 60 दिवसांत एक लाख सक्रिय रुग्ण, ठळक बातम्या क्लिकवर

Breakfast News.jpeg
Breakfast News.jpeg

राज्यावर अवकाळी पावसाचे सावट आहे. राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा चटका कमी झाला आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. तर राज्यात कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिर औषधांचा मोठा तुटवडा भासत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची हे औषध मिळवण्यासाठी भटकंती सुरु आहे. दरम्यान, याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी आपले मत व्यक्त केले आहे. रेमडेसिव्हिरमुळे एक दिवस अगोदर रुग्ण बरा होवू शकतो, म्हणजे बुधवारी बरा होणारा रुग्ण मंगळवारी बरा होतो, एवढाच त्याचा फायदा असल्याची स्पष्टोक्ती तज्ज्ञांनी केली आहे. अशाच देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर.


पुणे - महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी पावसाचे सावट पडले आहे. मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. राज्यात दोन दिवसांपासून उन्हाचा चटका कमी झाला आहे. येत्या आठवडाभर हा चटका कमी राहणार आहे. त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात काहीशी घट झाली आहे. राज्यात पाच ते सहा दिवस पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर


मुंबई - ‘‘कोरोना संसर्गामुळे एखाद्या रुग्णाचा जीव जात असेल, तर त्याला रेमडेसिव्हिर जीवदान देवू शकत नाही. कोरोनावर रामबाण ठरेल असे कोणतेही औषध जगात उपलब्ध नाही. रेमडेसिव्हिरमुळे एक दिवस अगोदर रुग्ण बरा होवू शकतो, म्हणजे बुधवारी बरा होणारा रुग्ण मंगळवारी बरा होतो, एवढाच त्याचा फायदा असल्याची स्पष्टोक्ती डॉ. अविनाश सुपे यांनी केली, पण संसर्गामुळे शेवटच्या टप्प्यात असणाऱ्या रुग्णाला वाचविण्यासाठी या औषधांचा उपयोग होत नसल्याचे डॉ. सुपे यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर


पुणे - पुणे जिल्ह्यात अवघ्या ६० दिवसांमध्ये कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येने एक लाखाचा टप्पा ओलांडला. जिल्ह्यात ११ मार्चला सर्वांत कमी कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. आता ११ एप्रिलला ही संख्या एक लाख दोन हजारांवर पोचली.कोरोनाच्या पहिल्या लाटेत गेल्या वर्षी १६ सप्टेंबरला पुणे जिल्ह्यात कोरोनाचे ८२ हजार १७२ सक्रिय रुग्ण होते. त्यानंतर रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत गेली. ती ११ फेब्रुवारीपर्यंत सर्वांत कमी नोंदल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. वाचा सविस्तर

म्हसरूळ (नाशिक) - कोरोना संसर्गाच्या लाटेचा फायदा घेणाऱ्या खासगी रुग्णालयांकडून होणाऱ्या अव्वाच्या सव्वा बिलांचे किस्से बाहेर येत असताना ज्या इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा सुरू आहे, ते बाराशे रुपये किमतीचे इंजेक्शन तब्बल २५ हजार रुपयांना विकणाऱ्या डॉक्टरला आप्तस्वकीयांची सतर्कता व पोलिस वेळेवर पोचल्याने रविवारी (ता. ११) रात्री रंगेहाथ पकडण्यात आले. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. काय घडले नेमके? वाचा सविस्तर


मुंबई- मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेला कोविड-19 लस साठा उपलब्ध झाल्याने आजपासून मुंबईतील निर्देशित 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. वाचा सविस्तर 

IPL 2021, SRHvsKKR 3rd Match- चेन्नईच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने डेविड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादच्या संघाला रोखत स्पर्धेत विजयी सलामी दिली. कोलकाता नाईट रायडर्सने 10 धावांनी विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून सनरायझर्स हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीवीर नितीश राणा 80 (56) आणि राहुल त्रिपाठी 53 (29) यांनी केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताच्या संघाने निर्धारित 20 षटकात 6 बाद 187 धावा केल्या होत्या. वाचा सविस्तर 

सोलापूर - कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढू लागला आहे. त्यासाठी सेवानिृत्त परिचारिका, डॉक्‍टरांची मदत घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. सोलापूर महापालिकेअंतर्गत सध्या शंभर डॉक्‍टर कोरोना रुग्णांची सेवा करीत आहेत. त्यातील 68 डॉक्‍टर 'बीएएमएस' असून त्यांना प्रत्येकी 40 हजारांच्या दरमहा मानधनावर घेतले आहे. वाचा सविस्तर

नागपूर - राज्यासह शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीत खूप वाढ झालेली आहे. बेड, रेमडिसिव्हिरनंतर आता ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. जिल्ह्यात पाच ते सहाच ऑक्सिजनचे पुरवठादार असून आता पुरवठा जिल्हा प्रशासनाने स्वतःच्या हातात घेतला आहे. वाचा सविस्तर

कोल्हापूर- दहावी शिक्षण पूर्ण होण्यापूर्वी विद्यार्थ्यांचे सर्व निर्णय पालक व त्यांचे जवळचे नातेवाईक घेत असतात. मात्र दहावीची परीक्षा झाल्यानंतर  विद्यार्थ्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिले जाते. खूप सारे ऑप्शन्स असल्यामुळे तुम्हाला करिअर निवडताना अडचणी खूप येत असतील. मात्र निरीक्षण आणि डिस्कशन नंतर घेतलेला निर्णय हा नेहमी फायदेशीर ठरू शकतो. वाचा सविस्तर

पुणे - बराच वेळ नाही पण जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला मोठ्या संख्येने इलेक्ट्रिक गाड्या पहायला लागतो. बर्‍याच लोकप्रिय कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत आणि मोठ्या संख्येने नवीन स्टार्टअप देखील या विभागात प्रवेश करत आहेत. आता पूर्णपणे नवीन स्टार्टअप समोर आला आहे, ज्याने आपली अनोखी एसयूव्ही (SUV) इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. कॅलिफोर्निया आधारित स्टार्टअप, (Humble Motors) हंबल मोटर्सने एक इलेक्ट्रिक एसयूव्ही तयार केली आहे जी सूर्यप्रकाशाद्वारे चालेल. वाचा सविस्तर

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com